सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शासनाचे दुर्लक्ष, घटनेची चौकशी करावी : चंद्रशेखर बावनकुळे

शासनाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली असून मृतकांच्या परिवाराला प्रत्येकी 10 लाख रुपये नुकसानभरपाई शासनाने दिली पाहिजे, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Snehal Joshi .
  • Jan 9 2021 11:34PM
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे
लागलेल्या आगीत 10 बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी असून या प्रकरणी त्वरित चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली. श्री. बावनकुळे यांनी आज सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे भेट देऊन मृत झालेल्या मुलांच्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत माजी आ. चरण वाघमारे उपस्थित होते.
भंडाराचा मी माजी पालकमंत्री आहे. पालकमंत्री असताना दर आठवड्याला मी भंडार्‍यात येऊन
शासकीय अधिकार्‍यांच्या बैठकी घेतल्या व अडीअडचणींवर चर्चा करून उपाययोजना केल्या आहेत. तसेच अनेक नागरिकांच्या समस्याही ऐकून घेऊन त्यावर उपाययोजना केल्या. भंडारा जिल्ह्याच्या विद्यमान पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे. जिल्हा सामान्य रुग्णालयाने दुरुस्तीसाठी प्रस्ताव 2020 मध्येच पाठविला असताना महाविकास आघाडी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. शासनाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली असून मृतकांच्या परिवाराला प्रत्येकी 10 लाख रुपये नुकसानभरपाई शासनाने दिली पाहिजे, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार