सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शिक्षणाचा उपयोग मागास भागात सामाजिक आर्थिक परिवर्तनासाठी व्हावा : ना. गडकरी

शिक्षणाचा उपयोग मागास भागात सामाजिक आर्थिक परिवर्तनासाठी व्हावा : ना. गडकरी आसाम विद्यापीठाचा 18 वा दीक्षांत समारंभ

Snehal Joshi .
  • Dec 27 2020 8:29PM
शिक्षण ही एक शक्ती आहे. संशोधन, उद्यमशीलता, विज्ञान, तंत्रज्ञान, नाविण्य, कौशल्य आणि यशस्वी प्रयोग म्हणजे ज्ञान. हे ज्ञान मिळविल्यानंतर मिळालेल्या शिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांनी मागास भागात सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी करावा, असे आवाहन केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले. सर्व सुवर्णपदक प्राप्त आणि गुणवंतांचे याप्रसंगी ना. गडकरी यांनी अभिनंदन केले.
आसाम विद्यापीठाचा आज 18 वा दीक्षात समारंभ सिल्चर येथे पार पडला. या समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ना. गडकरी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, विद्यापीठाचे कुलगुरु व अन्य मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना ना. गडकरी पुढे म्हणाले- विद्यार्थ्यांनी शिक्षण म्हणजे काय हे आधी जाणून घेतले पाहिजे. भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था व्हावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केले आहे. 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था आणि 100 लाख कोटींच्या पायाभूत सुविधा हेही त्यांचे स्वप्न असून हे पूर्ण करण्याची आपली जबाबदारी आहे. शिक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग आपला देश, आपला प्रदेशाची प्रगती आणि विकासासाठी व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करताना ना. गडकरी म्हणाले- नावीण्यपूर्ण संशोधन, तंत्रज्ञान आणि यशस्वी प्रयोगांमुळे हा देश सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो. शिक्षणाचा, ज्ञानाचा उपयोग अविकसित, मागास असलेल्या प्रदेशात सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडावे यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग असावा. कृषी, उद्योग, संगणक तंत्रज्ञान, आयआयटी, आयटी, बायो टेक्नॉलॉजी, आरोग्य अशा सर्वच क्षेत्रात दर्जेदार सेवा देण्याची आज देशाला गरज आहे. यासाठी सर्वच क्षेत्रात सुधारणा घडविणे आवश्यक आहे. हे सर्व शिक्षणाच्या माध्यमातून होऊ शकते, हा शिक्षणाचा उद्देश आहे.
कृषी, ग्रामीण, आदिवासी भागात आज उद्योग नाही, पायाभूत सुविधा नाही, रोजगार नाही, त्यामुळे हे लोक शहराकडे स्थानांतरित होत आहेत. हे रोखण्यासाठी कृषी, ग्रामीण आणि आदिवासी भागाचा विकास करणे, पायाभूत सुविधा निर्माण करणे, उद्यमशीलता वाढीस लावणे आवश्यक झाले आहे. अशा पध्दतीचे परिवर्तन झाले तरच या क्षेत्राचे सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढून अर्थव्यवस्था मजबूत होईल, असेही ते म्हणाले.
तंत्रज्ञानाचा उपयोग करून जैविक इंधन बनविणे आता शक्य झाल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- ऊस, तांदूळ, मका, धानाचे तणस यापासूनही इंधन निर्मिती यशस्वी झाली आहे. शासनाने धान्यपासून इंधन निर्मितीला आता परवानगी दिली आहे. याचा फायदा घेत जैविक इंधनाची अर्थव्यवस्था 5 लाख कोटींची करणे देशासाठी आवश्यक आहे. संशोधन, नाविण्यपूर्ण संकल्पना यामुळे हे शक्य झाले असून सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी हे आवश्यक असून हा आत्मनिर्भरतेचा मार्ग आहे. आत्मनिर्भरतेच्या मार्गामुळेच पंतप्रधानांनी घोषित केलेल्या 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था आणि 100 लाख कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांचे स्वप्न साकार होईल, असेही ना. गडकरी म्हणाले

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार