सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वेबिनार कार्यक्रमाच्या माध्यमातून एकाच वेळी जिल्ह्यातील सर्व यंत्रणेशी संवाद साधणार

पालघर जिल्हयामध्ये मोठया प्रमाणात कोविड -१ ९ विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी

मनीष गुप्ता
  • Jun 10 2020 6:40PM
पालघर दि : पालघर जिल्हयामध्ये मोठया प्रमाणात कोविड -१ ९ विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी 
वेबिनार कार्यक्रमाच्या माध्यमातून दिनांक १०/०६/२०२० व दिनांक ११/०६/२०२० रोजी सकाळी ११ ते १ वाजता  एकाच वेळी  जिल्ह्यातील सर्व यंत्रणेशी संवाद साधणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले. 
           कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या असून त्या अनुषंगाने पालघर जिल्हयातील पिक कर्जवाटप , पिक विमा , मनरेगा , कोरोना प्रादुर्भाव व्यवस्थापन , अन्नधान्य वाटप व शैक्षणिक वर्षाकरीता शाळा सुरु करणेबाबत योजनांचा आढावा घेऊन  जिल्ह्यातील सर्व यंत्रणेला  निर्देश देण्याकरिता   आरोग्य अधिकारी , बालविकास अधिकारी , ग्रामपातळीवरील सरपंच , ग्रामसेवक , कृषि सहायक , बँकेचे अधिकारी , विकास सेवा संस्थेचे सचिव / चेअरमन , तलाठी , मुख्याधापक , पोलिस पाटील , आरोग्य सेविका , आशा कार्यकर्ती , अंगणवाडी सेविका , जल सुरक्षक , वनरक्षक , प्रत्येक ग्रामपंचायत मधील पाच शेतकरी गटातील गट प्रमुख यांचेशी चर्चा करण्यात  येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ . कैलास  शिंदे , जिल्हाधिकारी यांनी सांगितले. 
      वरील सर्व संबंधीत अधिकारी व कर्मचारी हे वेबिनार कार्यक्रमाच्या दिवशी विहीत वेळेत गावपातळीवर उपस्थित  राहावे या वेळी उपस्थितांनी मास्क , सॅनिटायझर , सामाजिक अंतर ( Social Distancing ) याचा वापर करणे बंधनकारक राहील . या व्यतिरीक्त स्थानिक लोकप्रतिनीधी व इतर नागरीक सदर कार्यक्रमा मध्ये सहभाग घेवू इच्छित असल्यास त्यांनी सामाजिक अंतर पाळून  कार्यक्रमा मध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार