सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्रातील शाळा महाविद्यालय कधी सुरू होणार ? अधिक माहितीसाठी जाणून घ्या

महाराष्ट्रात  काही दिवसांपासून शाळा कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मग ते पालक शिक्षक किंवा विद्यार्थी कोणीही असो. शिक्षण विभागात 15 जून पासून ग्रीन जूनमध्ये शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

Snehal Joshi
  • May 31 2020 2:45PM

महाराष्ट्रात  काही दिवसांपासून शाळा कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मग ते पालक शिक्षक किंवा विद्यार्थी कोणीही असो. शिक्षण विभागात 15 जून पासून ग्रीन जूनमध्ये शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते. पण त्यात विरोध होत असल्याने ऑनलाईन, दूरदर्शन, प्रसार भारतीच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  सुविधांच्या अभावामुळे विरोध होत आहे. असे असताना केंद्र सरकारने 30 जून पर्यंत लोक दोन 5.0 असणार आहे अशी घोषणा  शनिवारी केली.  यात शाळा महाविद्यालय, प्रशिक्षण संस्था, खाजगी क्लासेस जून महिन्यात बंद असणार आहेत.  जुलै महिन्यात राज्य सरकार यासंदर्भात शाळा पालक-शिक्षक संघटना यांच्याशी चर्चा करून शाळा-महाविद्यालय कधी आणि कसे सुरु करायचे यावर विचारमंथन करतील. तसेच शाळा महाविद्यालय सुरू करताना सोशल डिस्टन्स, स्वच्छता, विद्यार्थ्यांची सुरक्षा याचा देखील विचार केला जाईल..   महाराष्ट्र शासनाला केंद्र शासनाची सल्लामसलत केल्यानंतर  निर्णय घेण्यात येईल. महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाला   जुलै महिन्यात निर्णय घेताना रेड जॉन मधील विद्यार्थी तेथील विद्यार्थी वाहतूक, शाळा यांचाही सखोल विचार करावा लागेल. नंतर शाळा महाविद्यालय सुरू करण्यात येतील. त्यामुळे यंदा शाळेची घंटा 15 ऑगस्ट नंतरच वाजण्याची शक्यता आहे.

UGC  ने केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे प्रथम वर्ष वगळता इतर वर्षातील विद्यार्थ्यांचे वर्ग 1 ऑगस्ट पासून सुरू करण्यात येणार आहेत. मात्र यात सुरक्षेची जबाबदारी घेऊन त्याबाबत जुलै महिन्यात निर्णय घेण्यात येणार आहेत. राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील  शैक्षणिक महाविद्यालय,  शिक्षक, विद्यार्थी, पालक यांचे लक्ष लागले आहे..

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार