सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी परीक्षेसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे

देशभरात परीक्षा केंद्राच्या संख्येत वाढ

Aishwarya Dubey
  • Aug 27 2020 7:47PM

करोनामुळे शैक्षणिक वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. NEET व JEE परीक्षाही केंद्र सरकारनं पुढे ढकलली होती. अखरे ही परीक्षा घेण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आलं असून, परीक्षा घेण्यावरून दोन गट पडले असल्याचं दिसत आहे. दरम्यान, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी परीक्षेसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.

१ सप्टेंबरपासून घेण्यात येणाऱ्या NEET व JEE परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी महत्त्वाची माहिती दिली. शिक्षणमंत्री म्हणाले, “नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या संचालकांनी मला माहिती दिली आहे की, JEE परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या ८.५८ लाख विद्यार्थ्यांपैकी ७.५ लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश ओळखपत्र डाऊनलोड केले आहेत. तर NEETसाठी अर्ज भरलेल्या १५.९७ लाख विद्यार्थ्यापैकी १० लाख विद्यार्थ्यांनीही प्रवेश ओळखपत्र डाऊनलोड केले आहेत. हे कार्ड २४ तासात डाउनलोड करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचीच अशी इच्छा आहे की, कोणत्याही किंमतीत परीक्षा घ्याच, असंच यातून दिसून येतंय,” असं पोखरियाल म्हणाले.

“JEE परीक्षेसाठी परीक्षा केंद्राच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे. पूर्वी केंद्रांची संख्या ५७० इतकी होती. ती आता ६६० इतकी करण्यात आली आहे. त्याचबरोबर NEETच्या परीक्षा केंद्राची संख्या वाढवण्यात आली आहे. २ हजार ५४६ वरून NEET परीक्षा केंद्रांची संख्या ३ हजार ८४२ इतकी करण्यात आली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची केंद्र देण्यात आली आहेत,” असंही पोखरियाल म्हणाले.

 

करोनामुळे NEET व JEE परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. अखेर १ ते ६ सप्टेंबरदरम्यान या परीक्षा घेण्याचं केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं निश्चित केलं होतं. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. मात्र, न्यायालयानं यासंदर्भातील याचिका फेटाळून लावत परीक्षा घेण्यास परवानगी दिली. त्यानंतर अजूनही परीक्षेला होणारा विरोध मावळलेला नाही. मात्र, केंद्र सरकार परीक्षा घेण्याच्या भूमिकेवर ठाम आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार