सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मोदींकडून शरद पवारांना फोन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना रविवारी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पोटात दुखू लागल्याने शरद पवार यांची तपासणी केली असता पित्ताशयात खडे झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

Sudarshan MH
  • Mar 30 2021 11:01AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना रविवारी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पोटात दुखू लागल्याने शरद पवार यांची तपासणी केली असता पित्ताशयात खडे झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आलं. बुधवारी त्यांच्यावर एन्डोस्कोपी करण्यात येणार असून त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

यादरम्यान अनेकांनी शरद पवारांच्या प्रकृतीची चौकशी करत लवकर बरे व्हावेत यासाठी शुभेच्छा दिल्या. शरद पवारांनी ट्विट करत विचारपूस करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश आहे. मोदींनीही शरद पवारांना फोन करुन प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यानंतर शरद पवारांनी मोदींचे आभार मानणारं ट्विट केलं आहे.

 

शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती समोर आल्यानंतर राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांची प्रकृती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली आणि सदिच्छा व्यक्त केल्या. शरद पवारांनी ट्विट करत त्या सर्वांचे आभार मानले आहेत.

 

 

पवारांचे सर्व कार्यक्रम रद्द
पित्ताशयात खडे झाल्याने शरद पवारांना बुधवारी पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात येईल आणि पुढील उपचार करण्यात येणार आहेत. दरम्यान, प्रकृतीच्या कारणामुळे शरद पवार यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार