सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख मंत्र्यांची आणि नेत्यांची बैठक बोलावली

सचिन वझे, संजय राठोड, धनंजय मुंडे, अर्थसंकल्पीय अधिवेशनात सेना-राष्ट्रवादीमध्ये झालेली रस्सीखेच या सर्व गोष्टींचा आढावा शरद पवार बैठकीत घेणार आहेत.

Sudarshan MH
  • Mar 15 2021 10:50AM

 महाआघाडी सरकारमधील वादग्रस्त प्रकरण आणि सरकारची मलिन होत असलेली प्रतिमा  या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख मंत्र्यांची आणि नेत्यांची बैठक बोलावली आहे. दोन सत्रात ही बैठक होणार आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणापासून ते मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे अटकेपर्यंत या ना त्या मुद्यांमुळे महाविकास आघाडी सरकारला बॅकफूटवर जावे लागले आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची मुंबई महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

सचिन वझे, संजय राठोड, धनंजय मुंडे, अर्थसंकल्पीय अधिवेशनात सेना राष्ट्रवादीमध्ये झालेली रस्सीखेच या सर्व गोष्टींचा आढावा शरद पवार आजच्या बैठकीत घेणार आहेत. सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात ही बैठक होणार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार