सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नवाब मलिक यांचा जावई समीर खान अटकेत

ड्रग्ज प्रकरणात जावई समीर खानला अटक करण्यात आल्यामुळे नवाब मलिक यांच्यासमोरच्याही अडचणी वाढल्याचं बोललं जात आहे.

Sudarshan MH
  • Jan 14 2021 11:01AM

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) याच्या आत्महत्येनंतर NCB ने मुंबईतील अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांभोवती फास आवळण्यास सुरुवात केली आहे. याच प्रकरणात आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab malik) यांचा जावई समीर खान (samir khan) याला एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे.

ड्रग्ज प्रकरणात जावयाला अटक करण्यात आल्यामुळे नवाब मलिक यांच्यासमोरच्याही अडचणी वाढल्याचं बोललं जात आहे. समीर खान याला एनसीबीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला अटकही करण्यात आली.

 

 

दरम्यान, अंमली पदार्थ प्रकरणी फक्त बॉलिवूडच नाही तर उद्योगपती आणि श्रीमंतांची नावे देखील समोर आली आहेत. कोट्यधीश बिल्डर अशी ओळख असणाऱ्या करन सजनानी याला एनसीबीने बेड्या ठोकल्या. या करन सजनानी याच्या अटकेनंतरच विविध नावं समोर येऊ लागली. आधी मुच्छड पानवाला याचं नाव समोर आलं आणि आता समीर खान यालाही एनसीबीने अटक केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार