सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ड्रग्स प्रकरणी NCB बॉलिवूडमधील 25 सेलिब्रिटींची चौकशी करणार ?

ड्रग्स प्रकरणी एनसीबी मुंबई आणि गोव्यामध्ये छापे टाकत आहे.

Abhimanyu
  • Sep 12 2020 1:16PM

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर  समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविकसह NCB  ने 6 लोकांना अटक केली आहे. सुत्रांनी  दिलेल्या माहिती नुसार रिया चक्रवर्तीने NCB समोर ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूडमधील 25 सेलिब्रिटींची नावं घेतलेली आहेत. रिया आणि शौविकच्या चॅटमधून ही माहिती मिळाली असल्याची माहिती आहे. द टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार एनसीबीच्या रडारवर आता अभिनेत्री रकुलप्रीत सिंह, सारा अली खान,  आणि फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा ही नावं आहेत, कारण ही नावं रियानं घेतली असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.NCB ने रिया चक्रवतीच्या केलेल्य़ा चौकशी मध्ये बॉलिवूड 25 जणांची नावे घेतली आहेत. ज्यांना चौकशीसाठी एनसीबी बोलवण्याच्या तयारीत आहे. बॉलिवूड मधील हे 25 सेलिब्रिटी ड्रग्ज घेत असल्याची माहिती रियाने NCB ला दिलीय. रियाने दिलेल्या याच माहितीच्या आधारे आज एनसीबी मुंबई आणि गोव्यामध्ये छापे टाकत आहे. तर रियाचा भाऊ शौविकने ड्रग्जसाठी रिया कधी कधी आपल्या अकाउंट मधून पैसे देत असल्याची कबुली दिली आहे.

 सॅम्युअल आणि शौविक दोघांनीही रिया ही सुशांतसाठी ड्रग्ज मागवत असल्याची कबूली NCB ला दिली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार