सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आज पुन्हा वाढल्या Petrol-Diesel च्या किंमती

ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी राजधानी दिल्लीत सरकारी पेट्रोलच्या (Petrol Prices) दरात प्रतिलिटर 5 पैशांची वाढ केली आहे

Aishwarya Dubey ,twitter :@aishwar76156545
  • Jun 29 2020 8:40AM

आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Prices Today) मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी राजधानी दिल्लीत सरकारी पेट्रोलच्या (Petrol Prices) दरात प्रतिलिटर 5 पैशांची वाढ केली आहे. तर डिझेलच्या (Diesel Prices) किंमतीत प्रतिलिटर 13 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला एका लिटर पेट्रोलसाठी आता 80.43 रुपये द्यावे लागणार आहेत. तर, एक लिटर डिझेलची किंमत 80.53 रुपये असणार आहे. खरंतर, रविवारी तेलाच्या किंमतीत सतत होणारी वाढ थांबली होती. पण पुन्हा किंमती वाढल्या आहेत.

जाणून घ्या या शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol Price on 29 June 2020)

दिल्ली- पेट्रोल 80.43 रुपये आणि 80.53 रुपये लिटर आहे.

मुंबई- पेट्रोलचे दर 87.19 रुपये आणि डिझल 78.83 रुपये लिटर आहे.

कोलकाता- पेट्रोल 82.10 रुपये आणि डिझल 75.64 रुपये लिटर.

चेन्नई- पेट्रोल 83.63 रुपये आणि डिझलचे दर 77.72 रुपये लिटर आहे.

अशाप्रकारे तपासाल पेट्रोल-डिझेलचे नवे भाव

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. आपल्याला RSP<स्पेस> पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल.

दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. 23 दिवसांत पेट्रोलची किंमत 9.17 रुपयांनी तर डिझेलची किंमत 10.90 रुपयांवर गेली आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार