सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांच्या अडचणी वाढल्या

नोटीसीवर स्पष्टीकरण न दिल्यास प्रियंका गांधी यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते

Aishwarya Dubey ,twitter :@aishwar76156545
  • Jun 26 2020 9:04AM

कानपूर शेल्टर होम प्रकरणासंदर्भात सोशल मीडियावर केलेल्या  पोस्टमुळे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. प्रियंका गांधी वड्रा यांनी फेसबुकवर केलेल्या टिप्पणीनंतर उत्तर प्रदेश बाल संरक्षण हक्क आयोगाने काँग्रेस नेते प्रियंका गांधी वड्रा यांना नोटीस बजावली आहे.

आयोगाने नोटीसमध्ये प्रियंका गांधी यांना कानपूर निवारा गृह प्रकरणाबद्दल त्यांच्या फेसबुक पोस्टवर स्पष्टीकरण जारी करण्यास सांगितले आहे. नोटीसमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, वेळेत उत्तर सादर न केल्यास कारवाई करण्यात येईल.

कानपूरमधील उत्तर प्रदेश महिला आधार गृहात 7 तरुणी गर्भवती असल्याचे आढळले आहे आणि 57 जणं कोरोना संक्रमित असल्याचे समोर आले आहे.

शेल्टर होममधील तरुणी गर्भवती असून कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आणि डीजीपी यांना नोटीस पाठविली.

यासंदर्भात आयोगाने राज्याचे मुख्य सचिव आणि डीजीपी यांच्याकडे जाब विचारला होता. याशिवाय राज्य महिला आयोगाने कानपूरच्या डीएमकडे अहवाल मागितला.

 

 

 

57 मुली कोरोना पॉझिटिव्ह

या प्रकरणात, जिल्हा प्रोबेशन अधिकारी अजित यांनी कबूल केले होते की महिला निर्वासित आणि बाल सुधारगृहात क्षमतेपेक्षा जास्त महिला राहत आहेत. प्रोबेशन ऑफिसरने सांगितले की, गर्भवती मुलीला एचआयव्ही संसर्गाची माहिती नव्हती, जर असती तर त्याचा अहवाल सरकारकडे पाठविला असता. यासंदर्भात न्यूज 18 ने कानपूर जिल्हा दंडाधिकारी डॉ बीडीआर तिवारी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार