सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आर्थिक व्यवहार सुरू करण्यासाठी सरकारच्या नव्या गाइडलाइन

लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून बंद असणारे चित्रपटगृह कधी उघडणार यासंदर्भात अनेकांना प्रश्न पडला आहे. दरम्यान 'अनलॉक' च्या तिसऱ्या टप्प्यामध्ये परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती गृहमंत्रलयाकडून देण्यात आली आहे.

Aishwarya Dubey
  • May 31 2020 1:03PM

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून (Ministry of Home Affairs) शनिवारी आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू करण्याबाबत काही नवीन गाइडलाइन्स (MHA Guidelines) जारी करण्यात आल्या आहेत. सरकराने दिलेल्या माहितीनुसार कंटेनमेंट झोनमध्ये 30 जूनपर्यंत लॉकडाऊन सुरू राहणार आहे. अन्य ठिकाणी टप्प्या टप्प्याने काही व्यवहार सुरू करण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून बंद असणारे चित्रपटगृह कधी उघडणार यासंदर्भात अनेकांना प्रश्न पडला आहे. दरम्यान 'अनलॉक' च्या तिसऱ्या टप्प्यामध्ये परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार आहे. पुढच्या महिन्यात याबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.

दर आठवड्याला होत आहे 90 कोटींचे नुकसान

25 मार्चपासून सिनेमागृह बंद असल्यामुळे व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. काही फिल्म बिझनेस अहवाला्ंच्या मते सिनेमागृहं बंद असल्यामुळे या व्यवसायाला प्रत्येक आठवड्याला 80 ते 90 कोटींचे नुकसान सहन करावे लागत आहे.चित्रपटगृहांमध्ये शेवटचा प्रदर्शित झालेला सिनेमा अभिनेता इरफान खानचा 'अंग्रेजी मीडियम' हा होता.

तिसऱ्या फेजमध्ये सुरू होणार या सेवा

सिनेमागृहांव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय विमानसेवा, मेट्रो रेल्वे सेवा, जिम्स, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क्स यासांरख्या गोष्टी देखील तिसऱ्या फेजमध्ये उघडण्यात येतील, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. त्यावेळी असणारी परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल की ही ठिकाणं उघडण्यात यावी की नाही.

8 जून पासून सुरू होऊ शकतात शॉपिंग मॉल्स आणि रेस्टॉरंट्स

सरकारने मंदिर, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, हॉटेल्स आणि अन्य हॉस्पिटॅलिटी सेवांना 8 जून उघडण्यासाठी तयार राहण्यासाठी सांगितले आहे.कंटेनमेंट झोनमध्ये यातील काहीच उघडणार नाही. काही मीडिया अहवालांमध्ये सांगण्यात आले आहे की, पीव्हीआर सिनेमा जुलैच्या शेवटच्या दिवसात किंवा ऑगस्टच्या सुरूवातीला टप्प्या टप्प्याने सुरू होईल

ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार चित्रपट

सिनेमागृह बंद असलेल्यामुळे अनेक बहुप्रतिक्षित चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले जाणार आहेत. अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांचा 'गुलाबो सिताबो' तर विद्या बालनचा 'शकुंतला देवी' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बाँब' देखील हॉटस्टारवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार