सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

काय म्हणायचं याला! वाईन शॉपमध्ये घुसला

लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारनं वाईन शॉप सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरात मद्यपींची एकच गर्दी उसळली.

Sudarshan MH
  • May 5 2020 2:14PM

नवी दिल्ली, 05 मे : लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारनं वाईन शॉप सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरात मद्यपींची एकच गर्दी उसळली. लोकांची गर्दी पाहून अखेर काही राज्यांनी दुकानं बंद करण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर या तळीरामांची तुलना अर्थव्यवस्था तारणारे वॉरियर्स म्हणून होऊ लागली. एवढेच नाही तर, काही लोकांच्या बिलाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले होते. एका पठ्ठ्यानं तर तब्बल 95 हजारांची दारू विकत घेतली.

4 मे रोजी वाईन शॉप खुली करण्यात आल्यानंतर एकच गर्दी झाली. यात कर्नाटक राज्यानं रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. एका दिवसात कर्नाटक राज्यानं तब्बल 45 कोटी रुपयांच्या दारूची विक्री केली. यात एका इसमानं विकत घेतलेल्या 95 हजार 347 रुपयांची दारू विकत घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

दरम्यान लोकांनी केलेल्या गर्दीमुळे केरळ आणि मध्य प्रदेशातील दारूची दुकान बंद ठेवण्यात आलेली आहेत. तर दिल्ली सरकारनंही दारूवर अतिरिक्त 70 टक्के कोरोना साथीचा कर कारण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी आजपासून करण्यात येणार आहे

महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे या ठिकाणी दारूच्या दुकानांसमोर लोकांची प्रचंड गर्दी झालेली दिसली. तसेच बंगळुरू आणि अन्य भागातही दारूची दुकानं सुरू झाल्यावर लोक मोठ्या संख्येन दारू घेण्यासाठी आलेले पाहायला मिळले.

 

 
दरम्यान तमिळनाडू सरकारनं 7 मे पासून दारूची दुकानं सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र रेड झोनमधील दारूची दुकानं सुरू करण्याच्या शक्यतेला सरकारनं नकार दिला आहे. अशात ज्या भागात दारूची दुकानं सुरू करण्यात आली आहेत अशा काही ठिकाणी सरकार कडून जारी करण्यात आलेल्या सोशल डिस्टसिंगच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलेलं पाहायला मिळालं.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार