सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

देशात पहिल्या 75 दिवसांत जे झालं नाही ते गेल्या 3 दिवसांत घडलं. लॉकडाऊननंतर कोरोनाची भारतातली आकडेवारी धक्कादायक

भारतात लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. तरीही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढच होत चालली आहे. बुधवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार देशात कोरोना रुग्णांची संख्या 50 हजारांच्या वर पोहोचली आहे.

Sudarshan MH
  • May 7 2020 10:51AM

नवी दिल्ली, 07 मे : भारतात लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. तरीही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढच होत चालली आहे. बुधवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार देशात कोरोना रुग्णांची संख्या 50 हजारांच्या वर पोहोचली आहे. यात गेल्या तीन दिवसांत संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक राहिलं आहे. रविवारी 4 मे रोजी देशात कोरोनाचे 41 हजार रुग्ण होते. त्यात वाढ होऊन 6 मे रोजी रुग्णांची संख्या 50 हजारांच्या वर गेली. भारतात पहिल्या 75 दिवसांत कोरोनाचे 10 हजार रुग्ण सापडले होते.

देशात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारीला सापडला. त्यानंतर सव्वा दोन महिन्यांनी म्हणजेच 13 एप्रिलला देशातील कोरोना रुग्णांची संख्या 10 हजारांवर पोहोचली. त्यानंतर 8 दिवसांत 21 एप्रिल पर्यंत हाच आकडा 20 हजार झाला. तर पुढच्या 7 दिवसांत आणखी दहा हजार रुग्णांची भर पडली. 30 ते 40 हजारांचा टप्पा गाठण्यास फक्त 5 दिवस लागले. तर गेल्या तीन दिवसांतच देशात 10 हजार कोरोना रुग्ण सापडले.

लॉकडाऊनमुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश आल्याचं केंद्राकडून सांगण्यात येत आहे. मात्र आकडेवारी वेगळंच चित्र समोर मांडत आहे. देशात 24 मार्च पर्यंत कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या 571 होती. त्यानंतर लॉकडाऊन लागू करण्यात आला. या काळात सर्वाधिक 49 हजार 429 रुग्ण आढळले.

देशातील 11 राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या 1 हजारांहून अधिक आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यात 15 हजार कोरोनाचे रुग्ण आहेत. देशातील एकूण रुग्णसंख्येच्या 30 टक्के रुग्ण महाराष्ट्रातच आहेत. त्याखालोखाल गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पंजाब, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल यांचा क्रमांक लागतो.

देशात 1 मार्चपर्यंत फक्त केरळमध्ये 3 रुग्ण होते. तिघेही परदेशातून आले होते. त्यानंतर 14 मार्चपर्यंत ही संख्या 19 वर पोहोचली. तोपर्यंत महाराष्ट्रात 14 रुग्ण होते. त्यानंतर महाराष्ट्रातील रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाली. 11 मार्चला देशात कोरोनामुळे पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर 31 मार्चपर्यंत 50 जणांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर एप्रिल महिन्यात मृतांचे प्रमाण वाढले. एका महिन्यात 1100 लोकांचा मृत्यू झाला. मे महिन्यात तर पहिल्याच आठवड्यात 600 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत. रुग्णांच्या बाबतीत सांगायचे तर देशातील एकूण 24 राज्यात जितके रुग्ण आहेत तितके रुग्ण एकट्या गुजरातमध्ये आहेत. गुजरातमध्ये रुग्णांच्या संख्येत 190 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मृत्यूदरातही गुजरात महाराष्ट्रानंतर दुसऱ्या स्थानावर आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत 319 जणांचा मृत्यू झाला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार