सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

काँग्रेस नेत्यांनी केली मोठी मागणी

काँग्रेसच्या नेत्यानं पत्र लिहून राहुल गांधींच्या नेतृत्वाबाबत केली वरिष्ठांकडे 'ही' मागणी

Aishwarya Dubey
  • Aug 29 2020 10:07AM

काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून गटबाजी आणि अंतर्गत वाद समोर येत असतानाच आता काँग्रेसमधील एका नेत्यानं पत्र लिहून आणखीन एक मागणी केल्याचं समोर आलं आहे. काँग्रेस नेत्यांकडून अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्यानंतर पक्षातील वाद चव्हाट्यावर आली आहेत. हे पत्र लिहिलेल्या एका नेत्यानं राहुल गांधींच्या नेतृत्वासंदर्भात पत्रातून मागणी केली आहे.

काँग्रेस नेत्यानं पत्रातून 2024 च्या निवडणुकीचं नेतृत्व राहुल गांधींकडे देऊ नये अशी मागणी केली आहे. सलग दोन निवडणुकांमध्ये मोठा पराभव मिळाल्यानंतर पुन्हा एकदा राहुल गांधींकडे काँग्रेसची धुरा देऊ नये, अशी विनंती या पत्रातून करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसची कमान राहुल गांधींनी सांभाळावी अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असतानाच आता अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून येत आहेत. पक्षाध्यक्ष म्हणून राहुल गांधींना पाठिंबा देणारा एक गट आणि दुसरा त्यांना विरोध करणारा गट अशी गटबाजी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

'2024च्या निवडणुकीत राहुल गांधी पक्षाचं नेतृत्व करून 400 जागा जिंकून आणू शकतील हे आम्ही निश्चितपणे सांगू शकत नाही. 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला आणि भाजपचा विजय झाला.' असंही काँग्रेसच्या नेत्यानं या पत्रामध्ये लिहिल्याची माहिती मिळाली आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार