सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

PM मोदींच्या वैयक्तिक वेबसाईटचं ट्विटर अकाऊंट हॅक

चक्क देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाईटचं narendramodi.in ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्याची घटना घडली आहे.

Aishwarya Dubey
  • Sep 3 2020 9:57AM

देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर अकाउंट काही वेळासाठी हॅक झालं होतं. हे खातं त्यांच्या वैयक्तिक वेबसाइटवर जोडलं गेलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, या खात्यावर तब्बल 25 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. हॅकरने खातं हॅक केल्यानंतर चक्क बिटकॉईनची मागणी केली. यासंबंधी एक ट्विटही करण्यात आलं होतं. हॅकर्सनी ट्वीट करून पीएम नॅशनल रिलीफ फंडमध्ये क्रिप्टो चलनाद्वारे देणगी द्या असं लिहिलं गेलं होतं. पण त्यानंतर तात्काळ हे ट्वीट डिलीट करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

हॅकर्सनी मोदींच्या ट्विटर अकाऊंटवर लिहलं की, 'कोविड -19 साठी पंतप्रधान मोदी रिलीफ फंडामध्ये आपण दान करावे असं मी आपणास अपील करतो'. रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना ट्विटरनेही पंतप्रधान मोदींच्या वैयक्तिक वेबसाइटची लिंक अकाऊंट असल्याची कबुली दिली आहे.

 

काय आहे बिटकॉइन?

गेल्या काही दिवसांमध्ये बिटकॉइन विषयी चर्चा वाढली आहे. बिटकॉइन हे एक व्हर्च्युअल चलन आहे. हे डॉलर, रूपये किंवा पौंड सारख्या अन्य चलनांमध्ये देखील वापरलं जाऊ शकतं. ऑनलाइन देयकाव्यतिरिक्त, डॉलर आणि इतर एजन्सीमध्येसुद्धा ते बदललं जाऊ शकतात. हे चलन 2009 मध्ये बिटकॉइनच्या रूपात वापरात आलं होतं. आज याचा वापर जागतिक पेमेंटसाठीही केला जात आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार