सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शेअर बाजारात निराशाजनक सत्र

प्रमुख कंपन्यांमध्ये गुरुवारी टेक महिंद्राचे समभाग सर्वाधिक पाच टक्क्मयांनी घसरले आहेत. तर सोबत इन्फोसिस, एचडीएफसी, इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एनटीपीसीचे समभाग घसरले आहेत.

Sudarshan Marathi
  • May 15 2020 9:46AM

देशातील अर्थव्यवस्थेला कोरोनाच्या संकटात दिलासा देण्यासाठी आणि देशातील उद्योगधंद्याना चालना देण्यासाठी मोठय़ा प्रमाणात आर्थिक निधीची तरतूद सरकारकडून करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वीच केंदाने 20 लाख कोटी रुपयाचे अर्थ सहाय्य उद्योगाना देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. परंतु ही बाब शेअर बाजाराला एकच दिवस पसंत पडल्याचे पहावयास मिळाले असल्याचे गुरुवारच्या शेअर बाजारातील घरसणीवरुन निश्चित झाले असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. दिवसभरातील व्यवहार रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक या मोठय़ा कंपन्या व बँकांचे समभागांत मोठी घसरण गुरुवारी नोंदवण्यात आली आहे. दिवसअखेर सेन्सेक्स 885.72 अंकानी घसरुन निर्देशांक 31,122.89 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 240.80 अंकानी घसरुन निर्देशांक 9,142.75 वर बंद झाला आहे. दिवसभरातील उलाढालीच्या दरम्यान सेक्सेक्स955 अकांनी खालची पातळी गाठली होती.

प्रमुख कंपन्यांमध्ये गुरुवारी टेक महिंद्राचे समभाग सर्वाधिक पाच टक्क्मयांनी घसरले आहेत. तर सोबत इन्फोसिस, एचडीएफसी, इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एनटीपीसीचे समभाग घसरले आहेत. अन्य कंपन्यांच्या कामगिरीचा आलेख पाहिल्यास हिरो मोटोकॉर्प, लार्सन ऍण्ड टुब्रो, मारुती सुझुकी, अल्ट्राटेक सिमेंट आणि सन फार्मा यांचे समभाग मात्र नफ्यात राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.अमेरिकेतील बाजाराचा कल घसरणीकडे वळल्यामुळे भारतीय शेअर बाजाराचा सुर नकारात्मक होत सकाळच्या सुरुवातीपासूनच त्याने घसरणीने प्रारंभ केला आहे. विविध टप्प्यावर निर्माण होणारे संशोधनात्मक अहवालातून कोरोनाचा विळख्या आणखीन खुप वेळ राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत असल्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूदारांमध्ये दबावाचे वातावरण निर्माण होत असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार