सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सुदर्शन न्युज आणि गोरक्षकांच्या प्रयत्नांना यश; नंदुरबार शहर पोलिसांचा गोतस्करांना दणका; गोमांससह दीड लाखाचे गोवंश केले जप्त

रमजान ईद प्रसंगी शहरातील काही मोहल्ल्यांमधे मोठ्या संख्येने गोवंश कत्तलीसाठी आणल्याची तक्रार येथील गोरक्षकांनी केली होती. त्याची दखल घेत नंदुरबार शहर पोलिसांनी गो तस्करांना चांगलाच दणका दिला आणि सुमारे एक लाख 40 हजार रुपये किमतीच्या गाय बैलांसह मोठ्या प्रमाणात मांस जप्त करण्याची धडक कारवाई केली

ketan joshi
  • Jun 6 2020 6:47PM
नंदुरबार (प्रतिनिधी)- रमजान ईद प्रसंगी शहरातील काही मोहल्ल्यांमधे मोठ्या संख्येने गोवंश कत्तलीसाठी आणल्याची तक्रार येथील गोरक्षकांनी केली होती. त्याची दखल घेत नंदुरबार शहर पोलिसांनी  गो तस्करांना चांगलाच दणका दिला आणि सुमारे एक लाख 40 हजार रुपये किमतीच्या गाय बैलांसह मोठ्या प्रमाणात मांस जप्त करण्याची धडक कारवाई केली. विशेष असे की दोन वर्षापूर्वी सुद्धा आणि मागील रमजान च्या वेळी सुद्धा शहर पोलिसांनी कत्तलीसाठी बेकायदा गोवंश वाहून आणणार्‍यांवर अशीच कडक कारवाई केली होती.
याबाबत अधिक वृत्त असे की नंदुरबार शहरातील कुरेशी मोहल्ला, घोडापीर मोहल्ला, रजाक पार्क, अलीसाहेब मोहल्ला आणि अन्य ठिकाणी रमजान ईदच्या पार्श्‍वभूमीवर शेकडो गोवंश अशाप्रकारे कत्तलीसाठी आणून ठेवले असल्याची माहिती प्राप्त झाली. म्हणून ईदच्या आदल्या दिवशी नंदुरबार येथील गोरक्षकांनी ताबडतोब धाव घेऊन शनिवार दिनांक 23 मे रोजी रात्री शहर पोलीस ठाणे गाठून माहिती दिली होती व कत्तल होण्यापासून ते गोवंश वाचवावे, अशी विनंती पोलिस अधिकाऱ्यांना केली होती. लॉक डाऊन चालू असताना आणि वाहतुकीला बंदी असतानाही शहरात गोवंशाची कत्तल करून मांस वाहतूक व विक्री चोरट्या मार्गाने चालू होती का? असा प्रश्न त्यावरून उपस्थित झाला होता.महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारने वेळोवेळी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या मार्गदर्शनाखाली गोवंश हत्या आणि तस्करी ला बंदी घालणारे अनेक कायदे नियम लागू केले असून महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा कलम 5, 6, 9, 11, महाराष्ट्र कीपिंग अँड मोमेंट कॅटल इन अर्बन एरिया कंट्रोल एक्ट कलम 3, 13, पशु क्रूरता अधिनियम कलम  11 (1) व अन्य कायदे कलम अन्वये ताबडतोब ही गोवंश हत्या थांबवण्यात यावी, अशी लेखी अर्जाद्वारे मागणी केली होती. याचे जोरदार वृत्त सुदर्शन न्युज वाहिनीच्या माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर खळबळ उडाली होती. शहर पोलिसांनी त्यानंतर दखल घेऊन तपास सुरू केला होता. दरम्यान काल आज दिनांक 5 जून रोजी सकाळी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी पथकासह जाऊन अचानक तपासणी केली असता 1 लाख 39 हजार 900 रुपये किमतीचे 14 गाय बैल वासरू पत्र्याच्या शेडमध्ये क्रूर पद्धतीने कोंबून बांधलेले आढळून आले. शिवाय त्या ठिकाणी नुकतेच कापलेले मांस, चाकू, सुरे, कोयतेही सापडले. ते सर्व जप्त करीत मुस्‍तकीम शेख कुतुबुद्दीन कुरेशी या 28 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात तोंडाला मास्क अथवा रुमाल न बांधता कोरोना विषयक आदेशांचे उल्लंघन करणे तसेच प्राणीमात्र विषयक कायद्याचे उल्लंघन करणे या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला. येथे विशेष उल्लेखनीय हे आहे की नंदुरबार शहराबाहेरील डम्पिंग ग्राउंड वर मोठ्या प्रमाणात गोवंशाचे अवशेष फेकून दिलेले गोरक्षकांनी उघड केल्यावर मोठी खळबळ माजली होती आणि शहर पोलिसांनी ताबडतोब दखल घेत गोवंश कत्तल करणाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखवला होता. गोवंश कत्तलीचे हे चाललेले प्रकार थांबवण्यासाठी यापुढे नंदुरबार नगरपालिकेला देखील जबाबदार ठरवले जावे असा सूर गोप्रेमींमधून उमटला आहे. महाराष्ट्र कीपिंग अँड मोमेंट कॅटल इन अर्बन एरिया कंट्रोल एक्ट कलम 3, 13 अन्वये नगरपालिका क्षेत्रात कोणतेही पशु  पायी अथवा वाहनाने आणताना नगर पालिकेची अनुमती, मेडिकल सर्टिफिकेट व खरेदी पावती आवश्यक आहे. मात्र या नियमांचे नंदुरबार शहरात सर्रास उलनघन होतांना दिसते. या वर अंकुश म्हणून नगर पालिका, पोलीस आणि गौसेवक यांचा समावेश असलेले संयुक्त पथक तयार करून रोज चित्रीकरण करणे गरजेचे आहे. गोवंश हत्या थांबवण्याची इच्छा ठेवून जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या स्तरावरून यची दखल घेतली जाईल काय? असा प्रश्न केेला जात आहे.

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

कोरोना के कारण पीड़ित गरीब लोगो के लिए आर्थिक सहयोग

Donation
0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार