तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. नागपूर महापालिका आयुक्तपदी असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची मुंबईतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये बदली करण्यात आली आहे. नागपूर महापालिकेत बदली होण्याआधी तुकाराम मुंढे एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर होते. तत्कालीन फडणवीस सरकारने त्यांची एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर नियुक्ती केली होती.
तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांच्या जागी राधाकृष्णन बी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांना आपल्या पदाचा कार्यभार राधाकृष्णन यांच्याकडे सोपवून त्वरित नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्यास सांगण्यात आलं आहे.
दरम्यान तुकाराम मुंढे करोनाची लागण झाल्याने सध्या विलगीकरणात आहेत. त्यांनीच ट्विट करत आपल्याला संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. “मला करोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. तरीही नियम आणि अटींप्रमामे मी स्वत:चं आयसोलेट केलं आहे. मागील १४ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी करोनाची चाचणी करावी अशी विनंती आहे.