सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या नागपूरमध्ये महावितरणकडून ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्याची धडक मोहीम सुरू

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या नागपूरमध्ये महावितरणकडून ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्याची धडक मोहीम सुरू आहे

Sudarshan MH
  • Feb 12 2021 12:42PM

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या नागपूरमध्ये महावितरणकडून ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्याची धडक मोहीम सुरू आहे. गेल्या 4 दिवसांमध्ये शहरातील 1616 ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. कोरोना काळात या ग्राहकांना वीज बिलात सूट देण्यात आली होती, आता या सर्व ग्राहकांवर जवळपास 3 कोटीपेक्षाही जास्त वीज बील थकीत होते. त्यामुळे हे थकित बिल भरणाऱ्यांची वीज कापण्याची धडक मोहीम महावितरणकडून सुरू आहे. दरम्यान महावितरणकडून दररोज 500 हून अधिक वीज कनेक्शन कापण्याचे नियोजन आहे, अशी माहिती समोर येते आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री यांनी वीजबिल बिलात सूट देण्याचा शब्द दिला मात्र ग्राहकांना त्याचा कोणताही दिलासा मिळाला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पाहायला मिळते आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही बील न भरणारे 14 लाख कनेक्शन तोडणार!

1 एप्रिल 2020 पासून एकदाही वीजबिल न भरणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील 14 लाख 29 हजार 811 ग्राहकांनी थकबाकीचा भरणा न केल्यास नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई पुढील तीन आठवड्यात करण्याचे निर्देश महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालकांनी दिले आहे. महावितरणच्या आर्थिक संकटाचा विचार करून वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व सहकार्य करावे. आवश्यकता असल्यास हप्त्यांची देखील सोय केलेली आहे, असे आवाहनही महावितरणकडून करण्यात आले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार