सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सुशांतचे आज होणार अंत्यसंस्कार

सुशांतवर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सुशांतचा कौटुंबिक मित्र निशांत जैनने दिली आहे

Aishwarya Dubey ,twitter :@aishwar76156545
  • Jun 15 2020 9:13AM

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत याने काल मुंबईत आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण बॉलिवूड आणि राजकारणातही मोठा धक्का बसला आहे. तर सुशांतवर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सुशांतचा कौटुंबिक मित्र निशांत जैनने दिली आहे. इतकंच नाही तर त्याचे वडील आमदार नीरज बबलू यांच्यासह अन्य दोन सदस्य सुशांतच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईला पोहोचले असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

आज मुंबईत सुशांतवर अंत्यसंस्कार होणार आहेत. यासाठी त्याचे वडील केके सिंह आणि पाटणा इथला चुलत भाऊ आणि सुपौल इथला भाजपचे आमदार नीरज कुमार बाबूल यांच्यासह अन्य दोन सदस्य सकाळीच विमानानं मुंबईला रवाना झाले. तर सुशांतच्या आईचे 2002 मध्ये निधन झाले. याशिवाय त्याच्या चार बहिणी आहेत, त्यापैकी एक मीटू सिंग राज्यस्तरीय क्रिकेटपटू आहे.

 

सुशांत सिंह राजपूतच्या क्रिएटिव्ह मॅनेजरनं पोलिसांना सांगितलं की, सुशांत गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता. मात्र, तो औषधी घेत नव्हता आणि तो मेडिटेशनही करत नव्हता. लॉकडाऊन लागू झाल्यापासून क्रिएटिव्ह मॅनेजर आणि मॅनेजर हे दोघे सुशांतच्या अपार्टमेंटमध्येच राहात होते.

मॅनेजरनं सांगितलं की, रविवारी सकाळी 6 वाजता सुशांत नेहमीप्रमाणे उठला. त्याने 9.30 वाजेच्या सुमारात डाळिंबाचं ज्यूस प्यायलं आणि तो आपल्या खोलीत निघून गेला. दुपारच्या जेवणाचा मेनू विचारण्यासाठी स्वयंपाकीने 11.30 वाजता सुशांतच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. परंतु, सुशांतकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. .सुशांत झोपला असेल म्हणून स्वयंपाकी परत निघून आला.

 

मात्र, दुपारी 1 वाजता सुशांतनं दरवाजा न उघडल्यानं स्वयंपाकीला संशय आला. त्यानं क्रिएटिव मॅनेजर आणि मॅनेजरला सांगितलं. दोघेही तातडीनं सुशांतच्या खोलीजवळ आले. त्यांनीही सुशांतच्या खोलीचा दरवाजा जोरजोरात ठोठावला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. नंतर या मॅनेजरनं गोरेगाव येथे राहणाऱ्या सुशांतच्या बहिणीला फोन करून ही माहिती दिली. तीही तातडीने सुशांतच्या घरी पोहोचली. चावीवाल्याच्या मदतीने सुशांतच्या खोलीचा दरवाजा उघडण्यात आला असता सुशांतचा मृतदेह सिलिंग फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळून आता. सगळ्यांनी सुशांतला खाली उतरवं.

दरम्यान, सुशांतचा फोन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मात्र, कोड लॉकमुळे फोन उघडता आला नाही. सुशांतचा फोन अनलॉक झाल्यानंतर महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते, असं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिस सुशांतच्या मित्रांचीही चौकशी करणार असल्यांच बोललं जात आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार