सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या स्टँड-अप कॉमेडियन अग्रिमा जोशुआविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे

अग्रिमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.

Aishwarya Dubey
  • Jul 11 2020 10:56AM

 छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या  स्टँड-अप कॉमेडियन अग्रिमा जोशुआविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. संतप्त झालेल्या मनसेचे कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होतो, त्या ठिकाणी घुसून स्टुडिओची तोडफोड केली. तसंच अग्रिमाने आता तो व्हिडिओ सुद्धा डिलीट करून टाकला आहे.

शिवरायांबद्दल एकेरी उल्लेख केल्यामुळे अग्रिमा जोशुआने जाहीर माफी मागावी अशी मागणी होत होती. मनसेचे कार्यकर्ते यश रानडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईतील स्टुडिओवर धडक दिली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी संपूर्ण स्टुडिओची तोडफोड केली. त्यानंतर आयोजकांनी मनसे कार्यकर्त्यांकडे माफी मागितली. तसेच आयोजकांनी लेखी माफीनामाही लिहून दिला.

 

दरम्यान, दुसरीकडे अग्रिमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. ट्वीट करून तिने झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तसंच अग्रिमाने तिच्या कॉमेडीचा वादग्रस्त व्हिडिओ सुद्धा डिलीट केला आहे.

 

 

 

काय आहे प्रकरण?

अग्रिमा ही एक स्टँडअप कॉमेडियन आहे. तिचा हा व्हिडिओ मागील वर्षीचा आहे. तिने तिच्या युटूब चॅनेलवर 5 एप्रिल रोजी अपलोड केला होता. यातला एक मिनिटांचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली.

अग्रिमा जोशुआ म्हणाली की, 'अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवाजी या पुतळ्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मी इंटरनेटवर सर्च केले असता काही आढळले नाही. पण कुणीतरी एक निबंध लिहिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजी पुतळ्याचा मास्टरस्ट्रोक आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात सत्ता येईल. दुसऱ्या एका जणाला वाटलं काहीतरी क्रिएटिव्हिटी कॉंन्सेंट आहे, तो म्हणाला, यात जीपीएस ट्रेकरसुद्धा असणार आहे आणि त्यांच्या डोळ्यात लेझर लाईट निघणार आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून येणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर नजर ठेवली जाईल. त्यानंतर मला तिसरा व्यक्ती सापडला ज्याने  शिवाजी नाही तर शिवाजी महाराज म्हणा असं सांगितलं, बस्स मग मी त्यालाच फॉलो केलं.'

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार