सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोरोनाचा वेग जलद, प्रदूषणाचा वेग घटला

निसर्गाला प्रसन्न होण्याचे दिवस कोरोना मुळे आल्याने आता निसर्ग प्रसन्नतेने हसतो आहे. कोरोना टाळेबंदी मुळे कारखान्यातून बाहेर निघणारा धूर नाही

Snehal Joshi
  • Jun 7 2020 10:25AM
नागपूर -- निसर्गाला प्रसन्न होण्याचे दिवस कोरोना मुळे आल्याने आता निसर्ग प्रसन्नतेने हसतो आहे. कोरोना  टाळेबंदी मुळे कारखान्यातून बाहेर निघणारा धूर नाही. किंवा रस्त्यावरून धावणाऱ्या विषारी धूर वाहून नेणाऱ्या गाड्या नाही आणि गर्दी कमी झाल्याने परिणामी  10 शहरातील जल प्रदूषण सात टक्के वायुप्रदूषण 80 टक्के तर ध्वनिप्रदूषण 74 टक्के घटले आहे. त्यामुळे श्वसनाचे विकार आणि इतर             आजारांच्या तक्रारी 75 टक्क्याने कमी झाल्या असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
 कोरोना  चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊन मध्ये माणूस घरीच बंदिस्त झाला होता. सर्व व्यवहार बंद करुन निसर्ग स्वच्छ करून दाखवला. नद्या-नाले हवा आणि ध्वनी यांचे वाढलेले कमली बाहेरचे प्रदूषण कोरोनाचा  काळी  बंदीमुळे झपाट्याने कमी झाले आहे.

  मानवाने वैज्ञानिक प्रगती करताना निसर्गाचा अक्षम्य दुर्लक्ष करीत अगणित वृक्षतोड केली. परिणामी जलस्त्रोत आटले. आणि पाण्याची कमतरता झपाट्याने जाणवू लागली. मात्र या पायबंदीच्या काळात देश, राज्य अनेक गावातील नद्या नाले ओढे तलाव स्वच्छ झाले आहे.
 कारण कारखाने बंद  होती. सांड पाण्याचा वापर कमी झाला.  वाहन  रस्त्यावर नसल्याने वाढलेले वायू आणि ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर घटल्याचा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी )राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) ने दिला आहे. मार्च ते एप्रिल  या काळात देश आणि राज्यातील प्रदूषण कमालीचे घटले दर्शवणारी वरील आकडेवारी बरेच काही सांगून जात आहे.
लॉक डाऊन  मध्ये सर्वच ठप्प होतं. लाखो वाहनांचा धूर थांबला होता. त्यामुळे सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन या जीवघेण्या विषारी वायूंचे प्रमाण 75 टक्के घटले.शहरात आरटीओच्या  नोंदणी नुसार प्रत्येक मोठ्या शहरात किमान सुमारे 35 लाख वाहने आहेत.  या वाहनांची  वर्दळ थांबल्याने  प्रदूषण कमालीचे घटले. कार्बनडाय  ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड यांचे प्रमाण 81 टक्के इतके, 60 दिवसात कमी झाले हा  20 वर्षांनी प्रथमच इतका शुद्ध हवा शहरांचे नागरिक घेत आहे.  नद्या 70 टक्के शुद्ध झाल्याचे उघड झाले आहे. पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजनचे प्रमाण 3.1 वरून 4.6 झाले असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार