सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

प्रतिकूल परस्थितीत उज्वल यश संपादन करणाऱ्या कल्पेश दौडा यांना जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी दिला मदतीचा हात

अत्यंत प्रतिकूल परस्थिती असताना तसेच दोन्ही हात नसताना बिकट परिस्थिती ला आव्हान देत कल्लाले ता. पालघर येथील कल्पेश विलास दौडा या जिगरबाज विध्यार्थ्यांने बारावी मध्ये 68 टक्के गुण घेऊन उज्वल यश संपादन केले

Manish Gupta
  • Jul 29 2020 6:17PM
पालघर  :अत्यंत प्रतिकूल परस्थिती असताना तसेच दोन्ही हात नसताना बिकट परिस्थिती ला आव्हान  देत कल्लाले ता. पालघर येथील कल्पेश विलास दौडा या जिगरबाज विध्यार्थ्यांने बारावी मध्ये 68 टक्के गुण घेऊन उज्वल यश संपादन केले  या बाबतची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांना मिळताच त्यांनी कल्पेश च्या घरी जाऊन त्याचे कौतुक तर केलेच त्याला पुढील शिक्षणा साठी मदतीचा हात दिला. 
     जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी कल्पेशच्या घरी अचानक भेट दिल्या मुळे कल्पेशचे आई, वडील  तसेच कल्पेश भारावून गेले. जिल्हाधिकारी डॉ. शिंदे हे गरजू व्यक्ती प्रयत्न शासकीय योजना पोहचाव्यात आणि त्यांची प्रगती व्हावी यासाठी प्रयत्नशील असतात.  कल्पेशला देखील विस हजाराचा धनादेश दिला तसेच कल्पेशच्या आई, वडील, दोन बहिणी यांना नवीन कपडे, राशन इतर आवश्यक वस्तू त्यांनी भेट दिल्या असुन पुढील शिक्षणाचा खर्च जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय आणि तहसील कार्यालया मार्फत करणार असल्याचे सांगितले तसेच जिल्ह्यातील कोणताही विध्यार्थी   परस्थितीमुळे  शिक्षणा पासून वंचित राहणार नाही असेही सांगितले. 
 जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी कांबळगाव ता. पालघर येथील कोव्हिड केयर सेंटरला   अचानक भेट देऊन तेथील रुग्णाशी संवाद साधला.
तुम्हाला औषधं, गोळ्या नियमित  मिळतात का?  तुम्हाला चांगल्या प्रतीचे जेवण मिळते का?  नास्तामध्ये काय देतात. इथे काही अडचण आहे का? असे अनेक प्रश्न विचारून जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी कोव्हिड केयर सेंटर चा आढावा घेतला. जिल्हाधिकारी यांनी अचानक भेट दिल्याने रुग्णाना सुखद धक्का बसला. जिल्हाधिकारी डॉ. शिंदे हे जिल्ह्यातील  कॉरनटाइन सेंटर, कोव्हीड केयर सेंटर, कोव्हीड हॉस्पिटल येथे अचानक भेट देत असल्याने रुग्णांनी समाधान व्यक्त केले. 
यावेळी पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे. व इतर अधिकारी उपस्थित होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार