सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कॉरंटाइन सेंटर मध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून न दिल्यास कारवाई करणार - जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे

जिल्ह्यातील कॉरंटाइन सेंटर मध्ये पाणी,स्वच्छता, अन्न,वीज पुरवठा या मूलभूत सुविधा असणे आवश्यक या सुविधा उपलब्ध करून नदिल्यास संबंधित अधिकारी यांच्या वर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा

Manish Gupta
  • Jul 15 2020 11:55AM
पालघर दि 14 :  जिल्ह्यातील  कॉरंटाइन सेंटर मध्ये पाणी,स्वच्छता, अन्न,वीज पुरवठा या मूलभूत सुविधा असणे आवश्यक या सुविधा उपलब्ध करून नदिल्यास संबंधित अधिकारी यांच्या वर कारवाई करण्यात येणार असल्याचा  इशारा  जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे दिल्या.
 जिल्ह्यातील सर्व कॉरंटाइन सेंटरचा आढावा घेण्यासाठी  व्हिडीओ कॉन्फरन्स  आयोजित केली होती,त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. शिंदे बोलत होते
        या कॉन्फरन्स मध्ये उपजिल्हाधिकारी किरण महाजन, तहसीलदार महसूल उज्वला भगत,  जिल्हा शल्य चिकित्सक कांचन वानेरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलिंद चव्हाण, डॉ.सागर पाटील, डहाणू,जव्हार वाडा येथील प्रांत अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, उप अभियंता, वैद्यकीय अधीक्षक , तालुका वैद्यकीय अधिकारी, व कोव्हीड केअर सेंटर साठी नेमणूक केलेले सर्व समनव्य अधिकारी सहभागी झाले होते. 
   
 या व्ही.सी द्वारे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व केंद्रांचा आढावा घेऊन जिथे जिथे पाणी, वीज, स्वच्छता, यांचा अभाव आहे,जेथे नाश्ता, जेवण वेळेवर दिले जात नाही तिथे या सर्व सुविधा लवकरात लवकर उपलब्ध झाल्या पाहिजेत.संबंधित उप अभियंत्याकडून  या सर्व गोष्टींमध्ये तात्काळ सुधारणा करून घ्याव्या अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना दिल्या,तसेच जो आपल्या कामात निष्काळजीपणा  करीत असेल त्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे आदेश  जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी अधिकारीवर्गाला दिले.कॉरंटाईन सेंटर मध्ये मूलभूत गरजांकडे लक्ष देण्याच्या सूचना  जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी दिल्या  

    कॉरंटाइन सेन्टर मध्ये असलेल्या  व्यक्तींना सकाळी काढा पिण्यासाठी गरम पाणी देण्यात यावे, वेळेवर नाश्ता,जेवण उपलब्ध व्हावे, शौचालय व बाथरूम ची नियमित साफसफाई करण्यात यावी, चादरी  बदलण्यात याव्यात,मनोरंजनाची सुविधा असावी, सी. सी टीव्ही कॅमेरा बसवण्यात यावेत,जेथे जनरेटरची उपलब्धता नाही तेथे तात्काळ जनरेटर उपलब्ध करावे,इ. सर्व सुविधा सर्व केंद्रात असणे आवश्यक असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी सांगितले.
      कॉरंटाइन केंद्राजवळ डॉक्टरानीं राहावे यासाठी   त्वरित पाठपुरावा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी दिले.

    जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आठवड्यातुन दोनदा कॉरंटाइन सेन्टरला भेट देणे गरजेचे असून,प्रांत अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी आपापल्या भेटीचे वेळापत्रक ठरवण्याच्या सूचना देऊन स्वतः आठवड्यातून एकदा  कॉरंटाइन सेन्टर ला भेट देऊन परिस्थिती जाणून  घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
       नम्र पणे जनतेला मदत करण्याचा प्रत्येक अधिकाऱ्याचा हेतू असला पाहिजे,जबाबदारी झटकून देणाऱ्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार