सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुंबईकरांसाठी मोठी बातमी

मुंबईत 71 खासगी रुग्णालयात, 10 आणि 11 एप्रिल असे दोन दिवस लसीकरण थांबले होते.

Sudarshan MH
  • Apr 12 2021 12:15PM

राज्यात कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरणावर भर देण्यात आला होता. पण, लशीचा साठा संपल्यामुळे लसीकरण थांबवण्यात आले होते. अखेर बृहन्मुंबई महानगरपालिकेला कोविड-19 लस साठा उपलब्ध झाला असून आज 71 पैकी 62 खासगी रुग्णालयात कोविड लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि शासन यांच्यातर्फे मुंबईत 49 तर खासगी रुग्णालयात 71 लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. या सर्व केंद्रांवर मिळून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रतिदिन सरासरी 40 ते 50 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येते.

मुंबईत लसीकरणासाठी मंजुरी मिळालेल्या 71 खासगी रुग्णालयात 10 आणि 11 एप्रिल असे दोन दिवस लसीकरण थांबले होते. तथापि, मुंबई महानगरपालिकेच्या तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू होते.

लससाठा अधिक प्रमाणावर उपलब्ध होताच खासगी रुग्णालयातही लसीकरण पुनश्च सुरू केले जाईल, असे महानगरपालिकेने यापूर्वीच स्पष्ट केले होते.

शुक्रवार, दिनांक 9 एप्रिल 2021 रोजी रात्री उशिरा 99 हजार लसी आणि 10 एप्रिल रोजी 1 लाख 34 हजार 970 अश्या एकूण 2 लाख 33 हजार 970 लसींच्या मात्रा मागील दोन दिवसात बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाल्या आहेत. त्यातून खासगी रुग्णालयात लसीकरण केंद्रासाठी लस साठा वितरित करण्यात आला आहे. यामुळे सोमवार, दिनांक 12 एप्रिल 2021 रोजी नियमित वेळेत 71 पैकी 62 खासगी लसीकरण केंद्र देखील कार्यान्वित राहतील.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार