सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राजस्थानमधील राजकीय नाट्यावर सामना संपादकीयमधून भाष्य करण्यात आलं

राजस्थानमधील राजकीय नाट्यावर सामना संपादकीयमधून भाष्य करण्यात आलं असून फोन टॅपिंग तसंच पैशांच्या बळावर सरकार पाडणं घटनाद्रोह असल्याचे म्हटले आहे. “राजस्थानातील फोन टॅपिंगने अनेकांचे पितळ उघडे झाले

Aishwarya Dubey
  • Jul 20 2020 9:15AM

राजस्थानमधील राजकीय नाट्यावर सामना संपादकीयमधून भाष्य करण्यात आलं असून फोन टॅपिंग तसंच पैशांच्या बळावर सरकार पाडणं घटनाद्रोह असल्याचे म्हटले आहे. “राजस्थानातील फोन टॅपिंगने अनेकांचे पितळ उघडे झाले, पण काँगेस पुढाऱ्यांचे आपापसातील संभाषण कोणी चोरून ऐकले व ते राहुल गांधींपर्यंत पोहोचवले तरी बरेच गौप्यस्फोट होतील. राहुल गांधी यांना धड कामच करू द्यायचे नाही, असा विडाच काही लोकांनी उचलला आहे. याचा फटका समस्त विरोधी पक्षाला बसतो. फोन टॅपिंग हा गुन्हा व व्यक्तिगत स्वातंत्र्यावर आघात आहेच. लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले सरकार पैशांच्या बळावर पाडणे हा घटनाद्रोह आहे. त्यामुळे कोणता गुन्हा मोठा हे ठरवायला हवे,” असं शिवसेनेने सामना संपादकीयमध्ये म्हटलं आहे.

“राजस्थानमधील राजकीय युद्धाचे कवित्व अद्यापि संपलेले नाही. भारतीय जनता पक्षाबरोबर सचिन पायलट यांची जी सौदेबाजी सुरू होती ती पैशांच्या देवाणघेवाणीच्या टोकापर्यंत होती. म्हणजे राजस्थानचे गेहलोत सरकार हे पैसे चारून पाडायचे, घोडेबाजार करून बहुमत विकत घ्यायचे हे ठरले होते. सचिन पायलटांचे अन्यायाविरुद्ध बंड वगैरे प्रकरण झूठ होते याचा पर्दाफाश मुख्यमंत्री गेहलोत यांनी केला आणि त्यासाठी पायलट व भाजप नेत्यांमधील फोन संभाषण समोर आणले. ते धक्कादायक तितकेच खळबळजनक आहे. गेहलोत सरकार पाडण्यासाठी केंद्रीय सत्तेचा दबाव व पैशांचा वापर झाला. तो काँगेसने उधळून लावला,” असं शिवसेनेने सांगितलं आहे.

“भाजपचा कांगावा असा की, राजस्थान सरकारने बेकायदा फोन टॅपिंग केले. या फोन टॅपिंगची चौकशी आता केंद्रीय गृहखाते करणार आहे व तसे आदेश दिल्याचे वृत्त आम्ही वाचले. ते योग्यच आहे. अशा प्रकारे राजकीय पुढाऱ्यांचेच काय, तर कोणाचेही खासगी संभाषण चोरून ऐकणे हा गुन्हाच आहे. हा एखाद्याच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर घालाच आहे. त्यामुळे केंद्रीय गृहखाते याबाबत चौकशी करणार असेल तर त्यात चुकीचे काय? प्रश्न इतकाच आहे की, गेहलोत सरकारने हे फोन संभाषण ऐकले असेल तर अशी कोणती आणीबाणीची स्थिती देशात किंवा राज्यात उद्भवली होती? राजस्थानात बहुमताचे सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू होत्या व त्यासाठी आमदारांची खरेदी चढय़ा भावाने सुरू होती. सचिन पायलट यांच्या बंडामागे नीतिमत्ता कमी व पैशांची फूस जास्त होती. हा जनता व लोकशाहीशी द्रोह आहे. हा भ्रष्टाचारच आहे व गेहलोत सरकारने पुराव्याच्या आधारे भाजपचे एक नेते व केंद्रीयमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. शेखावत यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे व आरोप आहेत आणि त्याबाबत भाजप बोलायला तयार नाही. फोनवरील संभाषण ऐकणे, पाळत ठेवणे हे जितके बेकायदेशीर आहे, तितकेच सरकार पाडण्यासाठी आमदारांना विकत घेणेही गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य आहे,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.

“राजस्थानात राष्ट्रपती राजवट लावा अशी मागणी करणाऱ्यांनी अद्यापि त्यांच्या केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा का घेतला नाही? आधी गजेंद्र शेखावत यांचा राजीनामा घ्या, आमदार खरेदीच्या गुन्ह्याबद्दल प्रायश्चित्त घ्या व मग गेहलोत सरकारकडे बोट दाखवा. पायलट यांचे बंड फसल्याने भाजपचे कारस्थान उघड झाले. हे बंड फसफसले असते तर त्या आनंदोत्सवात सगळे गुन्हे पचवले गेले असते,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“महाराष्ट्रात जे ‘ठाकरे सरकार’ आहे ते जनतेने निवडून दिलेले नाही असा धोशा श्री. देवेंद्र फडणवीस नेहमी लावतात. त्यामुळे या सरकारला राज्य करण्याचा अधिकार नाही, असेही ते म्हणत असतात. ठीक आहे, पण बहुमताचा आकडा असणे हीच लोकशाही आहे ही घटनात्मक तरतूद तरी मानाल की नाही? दुसरे असे की, राजस्थानमधील गेहलोत सरकार तर लोकांनी निवडून दिलेले सरकार आहे. तरीही ते पाडण्याचा उद्योग झाला. मध्य प्रदेशात लोकांनी निवडून दिलेले सरकार होते. तेही पाडले. राजस्थानात पायलट विरुद्ध गेहलोत हा वाद होताच, पण तरीही हे सरकार अंतर्विरोधाने पडले नाही. उलट गेहलोत यांनी डाव भाजपवरच उलटवला. राजस्थानमधील पैशांच्या व्यवहाराबाबत ज्या ऑडिओ टेप्स समोर आल्या आहेत, त्यावर भाजपवाले म्हणतात, हे सर्व प्रकरण बनावट आहे. असेलही, पण चौकशी व्हायलाच हवी. फोन टॅपिंग प्रकरण साधे नाही व ते फक्त राजस्थानातच होत आहे अशातला प्रकार नाही. आपल्या देशावर आज अदृश्य आणीबाणीच्या सावल्या फिरत आहेत असा आरोप सुरू आहे,” असं सांगत शिवसेनेने केंद्रावर निशाणा साधला आहे.

“इंदिरा गांधी यांनी विरोधकांना तुरुंगात पाठवले, त्याची खदखद आजही व्यक्त होते, पण आज विरोधकांना उभेच राहू द्यायचे नाही. त्यांचे राजकीय, सामाजिक, मानसिक खच्चीकरण करायचे. त्यांच्या ताब्यात लोकशाही मार्गाने असलेली सत्तास्थाने काढून घ्यायची असले खेळ सुरू आहेत. महाराष्ट्रात सहा महिन्यांपूर्वी जे सत्ता स्थापनेचे रोमांचक नाट्य घडले, त्यात विरोधकांच्या फोन टॅपिंगची एक छटा होतीच. त्यावर बोलले की, अनेकांना मिरच्या झोंबतात, पण या मिरच्यांना बाजारात आज भाव उरलेला नाही. अशा मिरच्यांत तिखटपणा कमी व तडतडणे जास्त. तसे तडतडणे भाजपकडून सुरू आहे,” असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

“राजस्थान प्रकरणात भाजपची अवस्था ‘केले तुका आणि झाले माका’ अशीच झाली आहे. काँगेस पक्षावर, त्यांच्या कार्यपद्धतीवर फुले उधळण्याची आवश्यकता नाही. त्यांच्यात अंतर्गत कलह किंवा जुने-नवे वाद आहेत व ते संपणारे नाहीत. राहुल गांधी यांना यश मिळवू द्यायचे नाही यासाठीच जणू हे वाद काही ठरावीक मंडळींकडून ठरवून काढले जातात. मध्य प्रदेश त्यातूनच गेले. राजस्थान तूर्त बचावले,” असं शिवसेनेने म्हटलं आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार