सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्थगित

महाराष्ट्रातील करोना महामारी चा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी जुलै ते डिसेंबर 20 20दरम्यान होऊ घातलेली 12हजार 668 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात यावा.

Snehal Joshi
  • Jun 5 2020 6:07PM
महाराष्ट्रातील करोना महामारी चा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी जुलै ते डिसेंबर 20 20दरम्यान  होऊ घातलेली 12हजार 668 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात यावा. अशी विनंती राज्य शासनातर्फे राज्य निवडणूक आयोगास नुकतीच करण्यात आली होती. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आल्याचे  निवडणूक आयोगाने कळविले आहे. अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

 निवडणूक म्हटली की सामूहिक एकत्रीकरण येतच याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या यंत्रणा कामाला लागतात मग शिक्षकांचे प्रशिक्षण प्रचार आणि प्रचार साहित्य, मेळावे, पदयात्रा, वोटिंग मशीन चा सामूहिक वापर, आणि सगळ्यात महत्त्वाचं एकाच जागी गर्दी. आणि ही गर्दी कोरोना  पार्श्वभूमीवर धोकादायक ठरू शकते. शिवाय ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी करणे. मतदार यादी. त्यात प्रभागाची रचना, मतदार यादी तयार करणे.या  सगळ्याच बाबींना अधिक वेळ लागतो. 

राज्य सरकार मार्फत निवडणूक आयोगाला अशी विनंती करण्यात आली आहे. की पुढील सहा महिन्यासाठी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता. कुठलीही निवडणूक घेऊ नये. कारण निवडणूक म्हटलं की गर्दी ही आलीच.

 राज्यशासनाच्या विनंतीस मान देत. राज्य निवडणूक आयोगाने असे ठरवले की. निवडणूक आयोगाच्या 17 मार्च 2020 रोजी च्या पत्रानुसार जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही  त्या ज्या टप्प्यांवर असतील. आणि त्याचा टप्प्यांवर पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे.  त्या कार्यकारणी पुढील तसेच चालू न ठेवता त्याठिकाणी मुदत संपण्यापूर्वी योग्य प्रशासकाची नेमणूक करण्याची दक्षता घ्यावी. असे निवडणूक आयोगाने कळवले आहे. तसेच राज्य निवडणूक आयोग वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेऊन. व आवश्यकतेनुसार राज्य शासनाशी विचारविनिमय करून निवडणुकी वरील  स्थगिती उठविण्या बाबत व निवडणुका घेण्याबाबत निर्णय घेणार आहेत. असेही यावेळी आयोगाने कळवले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार