सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुंबईत हाय अलर्ट!

गुप्तचर यंत्रणांना प्राप्त झाली होती माहिती ; काही खलिस्तान समर्थक गट पाकिस्तानच्या आयएसआय च्या देखील संपर्कात

Sudarshan MH
  • Dec 31 2021 2:18PM

खलिस्तान समर्थक गटांनी आखलेल्या दहशतवादी कारवायांची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाल्यानंतर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, लुधियाना न्यायालयातील बॉम्बस्फोटांशी कथित संबंध असलेल्या सिख फॉर जस्टिस संघटनेचा (SFJ) सदस्य जसविंदर सिंग मुलतानीला ताब्यात घेतल्यानंतर आणि जर्मनीत चौकशी केल्यानंतर, मुंबई आणि इतर मोठ्या शहरांमध्ये नियोजित दहशतवादी हल्ल्यांची माहिती मिळाली होती

याबाबत माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्हाला माहिती मिळाली आहे की एसजीएफ व्यतिरिक्त, इतर प्रतिबंधित खलिस्तान समर्थक गट मुंबई, दिल्ली आणि इतर शहरांमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) च्या संपर्कात आहेत.”

शिख फॉर जस्टिस हा भारतातील नावाजलेला दहशतवादी गट आहे. मुंबई पोलिसांना अलर्ट जारी करण्यात आला असून सतर्क राहण्यास आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींकडे लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे.

तर, मुंबई पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला रॅपिड अॅक्शन टीम आणि बॉम्ब शोधक पथकाला सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार