सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाचव्या लॉकडाउनबाबत घोषणा

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाउन करण्यात आलं आहे. लॉकडाउनचा आता चौथा टप्पा उद्या दिवसांत संपुष्टात येणार आहे. पाचव्या लॉकडाउनची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात राज्यात काही अटी आणखी शिथिल कराव्यात अशी विनंती करण्यात आली आहे.

Aishwarya Dubey
  • May 30 2020 11:54AM

मुंबई, 30 मे : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाउन करण्यात आलं आहे. लॉकडाउनचा आता चौथा टप्पा उद्या दिवसांत संपुष्टात येणार आहे. पाचव्या लॉकडाउनची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात राज्यात काही अटी आणखी शिथिल कराव्यात अशी विनंती करण्यात आली आहे.

31 मे रोजी चौथा लॉकडाउनचा टप्पा संपत असताना महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रेड झोन क्षेत्रात  जास्त प्रमाणात दिलासा मिळावा तसंच रेड झोनशिवाय इतर भागात सध्या पेक्षा जास्त शिथिलता आणावी, अशी भूमिका मांडली आहे.  पाचवा लॉकडाउन वाढवला तरी राज्यात सर्वच क्षेत्रात जास्त मुभा मिळावी असा बहुतेक मंत्र्यांचा आग्रह आहे.

केंद्र सरकारकडून  लॉकडाउन 5बाबत भूमिका स्पष्ट केल्यानंतर राज्यातील लॉकडाउन बाबत निर्णय घेतला जाणार आहे. उद्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाचव्या लॉकडाउनबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुख्यमंत्री हे महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांसोबत दूरध्वनीवर चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती मिळतेय.

अजित पवारांनीही मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

विशेष म्हणजे,  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही चौथा लॉकडाउन संपल्यानंतर रेड झोन क्षेत्रात आणखी अटी शिथिल कराव्यात अशी भूमिका मांडली होती.

रेड झोन क्षेत्रात औद्योगिक आणि सामान्य जनजीवन सुरू करण्याबाबत काही निर्णय घ्यावे लागतील. मुंबई एमएमआरडीए परिसर, पुणे, पिपंरी-चिंचवड रेड झोन क्षेत्रात चौथा लॉकडाऊन संपल्यानंतर अधिक अटी शिथिल कराव्या लागतील, असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं होतं.

तसंच, गेल्या दोन महिन्यापासून राज्यातील  व्यवहार ठप्प आहे. लोकंही अडकून पडली आहे. त्यामुळे फार काळ लोकांना लॉकडाउनमध्ये आता अडकवणे योग्य नाही. योग्य खबरदारी घेऊन रेड झोन क्षेत्रात पुन्हा कार्यरत व्हावे लागेल, असंही अजित पवारांनी सांगितलं होतं.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार