सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्य सरकारनं मद्यप्रेमींना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. येत्या १४ तारखेपासून घरपोच दारू दिली जाणार आहे. काही अटी-शर्तींवर घरपोच दारुविक्रीला परवानगी देण्यात आली आहे

राज्य सरकारनं वाइन, बिअरची दुकाने खुली ठेवण्यास काही दिवसांपूर्वी परवानगी दिली होती. मात्र, दुकानांसमोर मोठी गर्दी होत होती. त्यामुळं सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचे समोर आले होते. याशिवाय पोलीस विभागांवर अतिरिक्त जबाबदारी आली होती.

Aishwarya Dubey
  • May 13 2020 12:52PM

राज्य सरकारनं वाइन, बिअरची दुकाने खुली ठेवण्यास काही दिवसांपूर्वी परवानगी दिली होती. मात्र, दुकानांसमोर मोठी गर्दी होत होती. त्यामुळं सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचे समोर आले होते. याशिवाय पोलीस विभागांवर अतिरिक्त जबाबदारी आली होती. त्यामुळं अनेक जिल्ह्यांत वाइन शॉप, मद्यविक्रीची दुकानं खुली ठेवण्यास विरोध झाला होता. मात्र, आता राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क विभागानं महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या १४ तारखेपासून घरपोच दारू दिली जाणार आहे. पण त्यासाठी काही अटी-शर्ती ठेवल्या आहेत. कन्टेन्मेंट झोन वगळता सर्वत्र घरपोच दारू देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली आहे.
दारूच्या दुकानांतून घरपोच मद्य देणारा डिलिव्हरी बॉय 'फिट' आहे का, याची तपासणी आरोग्य यंत्रणेमार्फत केली जाणार आहे. त्यानंतरच त्याला घरपोच दारू देण्यास परवानगी दिली जाणार आहे. जे दुकानमालक उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधतील, त्यांनाच परवानगी दिली जाईल. तसंच संबंधित डिलिव्हरी बॉयला विभागाकडून ओळखपत्र दिले जाणार आहे. त्यालाच मद्याची वाहतूक करता येणार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार