सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुंबईतील विविध भागांसह राज्यभरात वाढ असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे शासन-प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं

कोरोनाच्या स्थितीबाबत एक अहवाल सादर केला असून कोरोना संसर्ग कधीपर्यंत आटोक्यात येऊ शकतो, याबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे.

Aishwarya Dubey
  • Jul 20 2020 11:31AM

मुंबईतील विविध भागांसह राज्यभरात वाढ असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे शासन-प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. मात्र अशातच आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांनी कोरोनाच्या स्थितीबाबत एक अहवाल सादर केला असून कोरोना संसर्ग कधीपर्यंत आटोक्यात येऊ शकतो, याबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे.

राजधानी मुंबईतील करोना संसर्ग पुढील दोन आठवड्यांमध्ये नियंत्रणात येईल, असा अंदाज आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांनी व्यक्त केला आहे. तर राज्यात पुढील दोन महिन्यांत संक्रमण रोखण्यात यश येईल, असंही सांगण्यात आलं आहे. ‘लेविट्स मॅट्रिक्स’ या गणितीय प्रारूपाच्या आधारे हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रुग्णांची संख्या, मृत्यू दर त्यासाठीचा कालावधी याचा आधार मुंबईच्या संगणकशास्त्र विभागातील डॉ. भास्करन रमण यांनी यासाठी घेतला. याबाबत 'लोकसत्ता'ने वृत्त दिलं आहे.

दरम्यान, आयआयटीच्या अहवालानुसार मुंबईत करोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर 70 क्क्य़ांपर्यंत वाढला आहे. दोन आठवडय़ांत मुंबईत करोना नियंत्रणात येईल असा अंदाज या अहवालातून व्यक्त करण्यात आल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईत कोरोनाची काय आहे स्थिती?

रविवारी मुंबईत 1038 नवे रुग्ण

एकूण रुग्ण - 1 लाख 1 हजार 388

रविवारी मुंबईत 64 कोरोना रुग्णांचा मृत्यू

मुंबईत एकूण मृत्यू - 5714

मुंबईतील अ‍ॅक्टिव केसेस - 23 हजार 697

राज्यात काय आहे स्थिती?

राज्यात रविवारी 3906 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.62 टक्के असून आतापर्यत एकूण संख्या 1 लाख 69 हजार 569 झाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या 9518 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 1 लाख 28 हजार 730 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार