सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

Mumbai विमानतळावर मोठी कारवाई

Heroin Seized at Mumbai Airport: मुंबई विमानतळावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Sudarshan MH
  • Sep 22 2021 12:54PM

मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) कस्टम विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. विमानतळावर तब्बल 4.95 किलो हेरॉईन जप्त (4.95 kg heroine seized) करण्यात आले आहे. जोहान्सबर्ग येथून आलेल्या दोन महिलांकडून हे अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या या दोन महिला आई-मुलगी आहेत. रिपोर्ट्सनुसार, आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. काही दिवसांपूर्वी डीआरआयने गुजरातमधील मुंद्रा बंदरावर जवळपास 3 हजार किलो हेरॉईन जप्त केले होते.

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, कतार एअरलाईन्समध्ये प्रवास करणारी आई-मुलगी या जोहान्सबर्ग येथून मुंबईला येत होत्या. फुफ्फुसाच्या कर्करोगावर उपचाराच्या नावाखाली या दोघीही भारतात आल्या होत्या असे रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे. एजन्सीच्या मते, या तस्करांनी ट्रॉली बॅगमध्ये हेरॉईन लपवून टेवले होते. अधिकाऱ्यांच्या मते, सहसा प्रवासी एकावेळी दोन किलोपेक्षा जास्त औषधे घेऊन प्रवास करत नाहीत.

कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे हेरॉईन भारतात आणण्यासाठी दोन्ही महिला प्रवाशांना प्रत्येकी 5 हजार डॉलर देण्याचं सांगण्यात आलं होतं. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणात भारतातील आणखी कोणी सहभागी आहे का? याचा तपास आता करण्यात येत आहे.

अलीकडेच डीआरआयने गुजरातच्या मुंद्रा येथून दोन कंटेनरमधून 2 हजार 922.22 किलो हेरॉईन जप्त केले होते. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती आणि त्यासोबतच काही अफगाणिस्तानी नागरिकांचीही चौकशी केली जात होती. डीआरआयच्या अधिकाऱ्यांना या हेरॉईनच्या संदर्भात गुप्त माहिती मिळाली होती आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

इनपुटच्या आधारे डीआरआयने दोन कंटेनर अडवले आणि गांधीनगर येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या एक्सपर्टच्या उपस्थितीत कंटेनरची तपासणी करण्यात आली. द हिंदूच्या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, एक्सपर्ट्सने सामानाची तपासणी केली आणि हेरॉईन असल्याची पुष्टी केली. त्यानंतर हा सर्व अमली पदार्थाचा साठा जप्त केला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार