सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सरकारी सेवेतल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी एस.टी. महामंडळ विशेष फेऱ्या (ST Service ) सुरू करणार असल्याची घोषणा

कोरोनाचं संकट (Corona Crisis ) असल्याने सध्या रेल्वे आणि इतर सार्वजनिक वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी प्रचंड हाल सोसावे लागत आहेत.

Aishwarya Dubey
  • Sep 19 2020 8:47AM

 कोरोनाचं संकट (Corona Crisis ) असल्याने सध्या रेल्वे आणि इतर सार्वजनिक वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. मुंबई उपनगरात राहणाऱ्या लोकांचे तर अनेक तास फक्त बससाठीच्या रांगेतच जात आहेत. त्यात महिलांचे सर्वात जास्त हाल होत आहेत. आता सरकारी सेवेतल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी एस.टी. महामंडळ विशेष फेऱ्या (ST Service ) सुरू करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब (Minister Anil Parab) यांनी केली.

मुंबईत लोकल सेवा बंद असल्याने प्रवासासाठी प्रचंड हा अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. त्यात सरकारने ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचं प्रमाण वाढवलं आहे. त्यामुळे व्यवस्थेवरचा ताण आणखी वाढणार आहे. तो ताण कमी करण्यासाठी महिलांसाठी या फेऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. येत्या सोमवारपासून ही सेवा सुरू होणार आहे.

परब पुढे म्हणाले, पूर्ण विचाराअंती आम्ही एसटी बस सेवा पुर्ण क्षमतेने सुरू केलीय. मास्क, सेनिटाईज करणे बंधनकारक केलंय. सुरक्षा घेऊनच एसटी प्रवास सुरू केला आहे. एस टी आधीच तोट्यात होती. त्यामुळे कोरोनाच्या परीस्थितीत आणखी तोट्यात गेली. त्यामुळे आता एसटी सरू केलीय. राज्य सरकारकडे अतीरिक्त निधी मागितला आहे. एस टी कर्मर्चार्यांचे पगार लवकरच होतील. वैदीकीय क्षेत्रातील लोकांशी बोलूनच आम्ही हा निर्णय घेतलांय.

 

 

आम्ही राज्य चालवताना लोकांच्या सुरक्षेला प्राधान्य घेऊनच निर्णय घेतोय. त्यामुळे लोकल सेवा सुरू केली आणि त्यामुळे आणि पूर्वी प्रमाणे लोकांची गर्दी झाली दूर्दैवाने पुन्हा संसर्ग झाला कुणी दगावलं तर मनसे जबाबदारी घेणार आहे का...? त्यामुळे काळजी घेऊनच आम्ही लोकल सेवा सुरू करू असंही परब यांनी सांगितलं.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार