सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुंबईतील बोरीवली परिसरात एका शॉपिंग मॉलला भीषण आग लागली

अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन तब्बल 5 तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

Aishwarya Dubey
  • Jul 11 2020 12:40PM

मुंबईतील बोरीवली परिसरात एका शॉपिंग मॉलला भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. पण शॉपिंग मॉलला लागलेल्या आगीने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे.

बोरीवली परिसरात पहाटे 3 वाजेच्या सुमारास इंदिराप्रस्थ शॉपिंग सेंटरमध्ये आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रुप धारण करण संपूर्ण शॉपिंग सेंटर आगीच्या भक्ष्यस्थानी गेलं. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन तब्बल 5 तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले आहे. रोबोटच्या साह्याने जलद गतीने भडकलेल्या आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. याकरता जवळपास 14 फायर इंजीन, वॉटर टॅंकर आणि आग विझविण्याकरता विविध साहित्यांचा वापर केला गेला. लेव्हल 4 ची आग असल्याने सर्वच वरीष्ठ अधिकारी या घटनास्थळी उपस्थित होते

दरम्यान,  शॉपिंग मॉलला लागलेल्या आगीने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. कारण, जर फायर फायटिंग सिस्टिम नसेल आणि बेस मेंटमध्ये दुकाने असतील तर त्याला जबाबदार अधिकाऱ्यांना हे दिसलं नव्हतं का? दिवसा ही आग लागली आणि आणि बेसमेंटमध्ये लोकं असती तर मोठी हानी झाली असती.

उपस्थित केलेले प्रश्न?

प्रश्न 1 : बोरिवली सारख्या महत्वाच्या आणि गजबजलेल्या रेल्वे स्थानकाला अगदी खेटून हा मॉल कसा काय उभारला गेला?

प्रश्न 2 : बेसमेंटमध्ये दुकाने नसावीत असा नियम असताना बेसमेंटमध्ये दुकाने का सुरू होती?

प्रश्न 3 : मॉलमध्ये किंवा इमारतीत फायर फायटिंग सिस्टिम कार्यांन्वीत आहे का? याचे बीएमसी आणि अग्निशमन दलाकडून  करण्यात येते, या मॉलचे  झाले होते का?

प्रश्न 4 : बेसमेंटमध्ये अनधिकृत दुकानांवर कारवाई का केली गेली नव्हती?

प्रश्न 5 : मुंबई महानगरपालिका संबंधीत अधिका-यांवर कारवाई करणार का?

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार