सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मोठी बातमी: राज्य सरकारने केला खुलासा

राज्य सरकारने कोरोनासंदर्भात सोमवारी रात्रीपासून 30 एप्रिलपर्यंत नवीन नियमावली जाहीर केली आहे.

Sudarshan MH
  • Apr 7 2021 12:42PM

महाराष्ट्र सरकारने थेट लॉकडाऊनची घोषणा करण्याच्या ऐवजी कडक निर्बंध या शब्दाचा वापर करत सोमवारी रात्रीपासून 30 एप्रिलपर्यंत नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नवीन नियमावलीमध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स तसेच इतर काही व्यवसाय बंद ठेवण्याचा सूचना करण्यात आल्या असून फक्त पार्सल सुविधा देण्यास परवानगी देण्यात आली आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीबाबत जनतेमध्ये संभ्रम तयार होत असतानाच मंगळवारी दुपारपासून सर्वच दुकाने बंद करण्यात येत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी वाढली आहे. मंगळवारप्रमाणेच आज देखील राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी व्यापारी संघटना यांनी सर्व दुकाने बंद करू नयेत, अशी मागणी करत राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केलं. त्यानंतर आता दुकानांवरील निर्बंधांबाबत स्पष्टीकरत देत वरिष्ठ आयएएस अधिकारी असीम गुप्ता यांनी एक पत्रक काढलं आहे.

सार्वजनिक वाहतुकीस मान्यता असून काही अटींनुसार वाहतूक सुरू आहे. विशेष म्हणजे अत्यावश्यक सेवेच्या संदर्भात मालवाहतूक करणे तसेच दैनंदिन व्यवहारांच्या वापरामधील असणाऱ्या वस्तूंची मालवाहतूक करणे यास परवानगी असल्याचं सांगण्यात आलं आहे. विमान सेवेद्वारे मालवाहतूक सुद्धा सुरू असल्याचं राज्य सरकारने या पत्रकात म्हटलं आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार