सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

देशभरात लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकार गरीब आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विविध योजन राबवत आहे

देशभरात लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकार गरीब आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विविध योजन राबवत आहे. 'पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने'अंतर्गत सरकारकडून वार्षिक 6000 रुपये शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये पाठवले जातात

Sudarshan MH
  • May 8 2020 1:21PM

नवी दिल्ली, 08 मे : देशभरात लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकार गरीब आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विविध योजन राबवत आहे. या काळात शेतकऱ्यांना 'पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने'चा (PM Kisan Samman Nidhi Scheme) देखील लाभ होणार आहे. याच योजनेअंतर्गत सरकारकडून वार्षिक 6000 रुपये शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये पाठवले जातात. सरकारकडून 2000-2000 च्या तीन हप्त्यामध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाते.

आतापर्यंत 16,146 कोटी ट्रान्सफर

नुकतच अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 16,146 रुपये ट्रान्सफर झाले आहेत. हा या योजनेतील पहिला हप्ता आहे. जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही तपासून पाहू शकता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत की नाही. यासाठी अत्यंत सोपी प्रक्रिया आहे, ज्यामुळे तुम्हाला कळेल की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत की नाही.

-याकरता शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर त्याठिकाणी दिसणाऱ्या 'फार्मर कॉर्नर' या टॅबवर क्लिक करा. याठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या नावाची या योजनेसाठी नोंदणी देखील करू शकता.

-याठिकाणी या योजनेचे लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव, राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव तुम्हाला सहजरित्या मिळू शकेल. सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांची यादी या वेबसाइटवर अपलोड केली आहे. याठिकाणी तुमच्या अर्जाची सध्याची स्थिती काय आहे हे देखील समजेल. यासंदर्भातील माहिती तुम्ही किसान आधार नंबर/अकाऊंट नंबर आणि मोबाइल नंबरच्या माध्यमातून देखील मिळवू शकता.

-'फार्मर कॉर्नर'वर जाऊन 'लाभार्थी सूची' (लाभार्थी यादी) च्या लिंकवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, उप-जिल्हा आणि गावाची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुम्ही Get Report वर क्लिक केल्यास सर्व यादी मिळू शकेल.

-1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यामुळे आता नवीन यादी अपलोड केली जाईल. त्याआधी शेतकऱ्यांना त्यांचे नाव या यादीमध्ये तपासण्यासाठी आणि यामध्ये नाव देण्यासाठी अवधी दिला आहे.

-यासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी आणि तुमची माहिती अपडेट करण्यासाठी दोन पर्याय आहेत. pmkisan.gov.in या वेबसाइटवरून किंवा दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही मोबाइलमध्ये प्ले स्टोअर वरून किसान मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करू शकता.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार