सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून विविध बँकांचे काही महत्त्वाचे नियम बदलणार

पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून विविध बँकांचे काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. ज्याविषयी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण हे नियम माहित नसताना केलेली छोटीशी चूक तुमच्या खिशावर परिणाम करणारी ठरू शकते

Aishwarya Dubey ,twitter :@aishwar76156545
  • Jun 24 2020 9:25AM

पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून विविध बँकांचे काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. ज्याविषयी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण हे नियम माहित नसताना केलेली छोटीशी चूक तुमच्या खिशावर परिणाम करणारी ठरू शकते. यामध्ये पीएनबी बँकेचे बचत खात्यावरील व्याजदर कमी होणार, एटीएममधून पैसे काढण्यासंदर्भातील नियम तर खात्यात कमीत कमी शिल्लक ठेवण्यासंदर्भातील नियम यामध्ये महत्त्वाचेबदल होणार आहेत.

PNBच्या बचत खात्यावरील व्याज कमी होणार

पंजाब नॅशनल बँक (PNB)ने बचत खात्यावरील (Saving Account)मिळणाऱ्या व्याजदरामध्ये 0.50 टक्क्यांची कपात केली आहे. एक जुलैपासून पीएनबीच्या बचत खातेधारकांना वार्षिक केवळ 3.25 टक्के व्याज मिळेल. पीएनबीच्या बचत खात्यामधअये 50 लाख रुपयांपर्यंतचा बॅलन्स असेल तर वार्षिक 3 टक्के तर 50 लाखापेक्षा जास्त बॅलन्स असेल तर 3.25 टक्के व्याज मिळते.

याआधी देशातील मोठ्या बँकांपैकी एसबीआय आणि कोटक महिंद्रा या बँकानी देखील व्याजदरामध्ये कपात केली आहे.

1 जुलैपासून बदलणार ATM मधून पैसे काढण्याचा नियम

लॉकडाऊनमुळे एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल होणार आहे. 1 जुलैपासून तुमच्या खिशावरील भार वाढू शकतो. एटीएममधून पैसे काढणे 1 तारखेपासून महाग होणार आहे. अर्थ मंत्रालयाने एटीएममधून पैसे काढण्याठी सर्व ट्रान्झॅक्शन शूल्क हटवण्यात आले होते. कोरोना काळात नागरिकांवर आर्थिक भार येऊ नये याकरता हा निर्णय घेण्यात आला होता. 3 महिन्यासाठी देण्यात आलेली ही सूट 30 जून 2020 रोजी संपत आहे.

कमीतकमी बँलन्ससंदर्भात हा नियम बदलणार

कोरोना काळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी अशी घोषणा केली होती की, तुमच्या खात्यामध्ये निश्चित कमीतकमी बॅलन्स ठेवणे अनिवार्य नसेल. एप्रिल ते जून या महिन्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. कमीतकमी शिल्लक नसल्यास दंड आकारण्यात येणार नव्हता. मात्र आता ही सूट 30 जून रोजी संपणार आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार