सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

‘Horn OK Please’ची मनसे हाक

हॉर्न वाजवताना फेसबुक लाइव्ह करण्याचंही आवाहन

Aishwarya Dubey
  • Jun 12 2020 12:10PM

करोनामुळे वाहतूक व्यवसायाला बसलेला आर्थिक फटका आणि वाहतूक व्यवसायाशी संबंधित वर्गाचा आवाज सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी मनसेने हॉर्न ओके प्लिज आंदोलनाची हाक दिली आहे. ‘वाहतूक व्यवसायातील सर्वांचा आक्रोश बहिऱ्या राज्य सरकारच्या कानावर जावा, झोपेचं सोंग घेतलेलं राज्य सरकार खडबडून जाग व्हावं यासाठी शुक्रवार १२ जूनला संध्याकाळी ठीक ५ वाजता सर्वांनी फक्त एक मिनिट हॉर्न वाजवावा, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक शाखेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी केलं आहे. ट्विटरवरुन #MNSHornOKPlease हा हॅशटॅग वापरुन या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन मनसेमार्फत केलं जात आहे.

मेसेज केला जात आहे व्हायरल

या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभागी करुन घेण्यासंदर्भातील मेसेज व्हायरल केले जात आहे. ‘फक्त एक मिनिट हॉर्न वाजवा आंदोलन हे राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वाहतूक सेना आणि आपली स्वतःची लढवय्या ओळख दाखवणारं आंदोलन आहे. आपण आज आणि उद्याची दिवस-रात्र एक करा. आपल्या विभागातील मनसेच्या सर्व महिला पुरुष, पदाधिकाऱ्यांना व महाराष्ट्र सैनिकांना तसंच वाहनचालक – मालकांना भेटा. आंदोलनाबाबत त्यांना सविस्तर माहिती द्या. त्या सर्वांना आपल्याआपल्या विभागात असतील त्या ठिकाणी फक्त एक मिनिट हॉर्न वाजविण्याची विनंती करा,’ असं व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं आहे.

याचप्रमाणे हॉर्न वाजवण्याच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक मनसे पदाधिकाऱ्याने त्या ठिकाणावरून स्वतः व इतरांनाही फेसबुक लाईव्ह करायला सांगा असंही मनसे वाहतूक सेनेमार्फत सांगण्यात आलं आहे. या आंदोलनासंदर्भात सोशल नेटवर्किंगवर पोस्ट करताना #MNSHornOKPlease हा हॅशटॅग वापरा आणि हा हॅशटॅग व्हायरल करा असं आवाहन मनसे वाहतूक सेनेनं कार्यकर्त्यांना केलं आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार