सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सरकारची मोठी घोषणा! ऑल इंडिया परमिटसाठी नवा नियम लागू

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एका नव्या योजनेची घोषणा केली आहे. ज्याअंतर्गत कोणताही पर्यटक वाहन ऑपरेटर ऑनलाईनद्वारे ऑल इंडिया टूरिस्ट ऑथरायजेशन/ परमिटसाठी अर्ज करू शकतो.

Sudarshan MH
  • Mar 15 2021 11:02AM

केंद्र सरकाराने टूरिजमला प्रोत्साहन देण्यासाठी ऑल इंडिया टूरिस्ट परमिट ऑपरटर्सना ऑनलाईन अर्ज जमा केल्यानंतर 30 दिवसांमध्ये परमिट मिळेल अशी माहिती दिली आहे. हा नियम 1 एप्रिल 2021 पासून लागू होणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एका नव्या योजनेची घोषणा केली आहे. ज्याअंतर्गत कोणताही पर्यटक वाहन ऑपरेटर ऑनलाईनद्वारे ऑल इंडिया टूरिस्ट ऑथरायजेशन/ परमिटसाठी अर्ज करू शकतो.

हा नियम संबंधित कागदपत्र जमा केल्यानंतर आणि फीस भरल्यानंतर जारी केला जाईल. यासाठीची कागदपत्र जमा करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हा नवा नियम ऑल इंडिया टूरिस्ट ऑथरायजेश अँड परमिट रुल्स 2021 रुपात ओळखला जाईल.

परिवहन मंत्रालयानुसार, या स्किममध्ये टूरिस्ट व्हिकल ऑपरेटर्सला वेळेची फ्लेक्सिबिलिटी मिळेल. याअंतर्गत ऑपरेटरला तीन महिन्याचं परमिट मिळेल. अधिकाधिक 3 वर्षांपर्यंत परमिट दिलं जाऊ शकेल. गेल्या काही वर्षात देशातील पर्यटनातील वाढीच्या दृष्टीने मंत्रालयाने हे पाऊल उचललं आहे.

दरम्यान, 1 एप्रिल 2022 पासून सरकारी विभाग 15 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांच्या नोंदणीचं नुतनीकरण अर्थात रिन्यू करू शकणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हा प्रस्ताव आणला आहे. याबाबत अंतिम निर्णय आल्यानंतर ही व्यवस्था अंमलात आणली जाईल. मंत्रालयाने याबाबत नियमांमध्ये बदल करण्यासाठी अधिसूचना जारी केली असून भागधारकांकडून यासंबंधी प्रतिक्रिया मागवण्यात आल्या आहेत. हा नियम सरकारी वाहनं, केंद्र आणि राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, सार्वजनिक उपक्रम, नगरपालिका संस्था आणि स्वायत्त संस्थांना लागू होईल.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार