सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाज आक्रमक

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारला जाणार आहे. यासाठी साताऱ्याची निवड करण्यात आली आहे.

Aishwarya Dubey
  • Oct 7 2020 10:29AM

 मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे. आता मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी पहिली ठिणगी ही साताऱ्यात पडणार आहे. भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली दोन महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात न्यायालयीन लढा देण्यासाठी तयारी केली जात आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला आता दिशा देण्यासाठी मराठा समाज आंदोलकांनी मोठे पाऊल उचलले आहे.

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारला जाणार आहे. यासाठी साताऱ्याची निवड करण्यात आली आहे. भाजपचे राज्यसभेचे  खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात राज्यव्यापी बैठक दोन दिवसात पार पडणार आहे.

मराठा समाजाला आरक्षण कसे मिळवता येईल, सरकारवर कशा पद्धतीने दबाव टाकता येईल, या वेगवेगळ्या मुद्यांवर  या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळतेय. या बैठकीत राज्यात मराठा समाजाच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्यामुळे उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. उदयनराजे मराठा आरक्षणासाठी काय भूमिका मांडता याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मध्यंतरी उदयनराजे भोसले यांनी सरकारवर घणाघाती टीका करत इशारा दिला होता. 'मी सरकारला जाहीर आवाहन करतो. सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावं. अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे. कारण मराठा समाज आता एकटा नाही एवढच सांगतो,' असा आक्रमक इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला होता

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार