सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोरोना विरुद्ध लढणारे मानवतेचे जागतिक दीपस्तंभ म्हणून केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांची वर्ल्ड रेकॉर्ड स्टार 2020 बहुमानासाठी झाली निवड

कोरोना या महामारीचे संकट जगावर कोसळले असताना  या साथीच्या भयानक रोगाविरुद्ध गो कोरोनाचा नारा देऊन  लढण्याची हिम्मत देणारे तसेच लोकडाऊन च्या काळात गरीब गरजूंना भोजनदान

Aishwarya Dubey
  • May 20 2020 9:20AM

कोरोना या महामारीचे संकट जगावर कोसळले असताना  या साथीच्या भयानक रोगाविरुद्ध गो कोरोनाचा नारा देऊन  लढण्याची हिम्मत देणारे तसेच लोकडाऊन च्या काळात गरीब गरजूंना भोजनदान; अन्नधान्यासह विविध स्तरावर सतत मदत करणारे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांची लंडन च्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड ने कोरोना विरुद्ध लढणारे मानवतेचे मानवसेवे चे  जागतिक दीपस्तंभ म्हणून  वर्ल्ड रेकॉर्ड स्टार 2020 या बहुमानासाठी निवड करण्यात आली आहे त्याबाबत चे  गौरवपत्र ऑनलाइन सर्टीफेकेट  लंडनच्या वर्ल्ड रेकॉर्ड बुक तर्फे  नुकतेच ना रामदास आठवले यांना पाठविण्यात आले आहे. 

 कोरोनाविरुद्धच्या लढाईत लॉकडाऊन च्या काळात गरिबांची मानवसेवा कोण करीत आहे याबाबत चा सर्व्हे लंडन मधील बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे करण्यात आला. त्यात विविध क्षेत्रातील मान्यवर लॉक डाऊन च्या काळात करीत असलेल्या समाजसेवेची माहिती घेण्यात आली आहे. त्यात उत्कृष्ट सामाजिक सेवा करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांची वर्ल्ड रेकॉर्ड  स्टार 2020 ही डिक्शनरी प्रकाशित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुपूर्द करण्यात येणार आहे. समाजसेवा करणारे स्वयंप्रकाशित  दिशादर्शक तारे म्हणून या मान्यवरांना वर्ल्ड रेकॉर्ड स्टार 2020 या बहुमानाने गौरविण्यात येणार आहे. याबाबत चा समारंभ लॉकडाऊन संपल्यानंतर नोव्हेंबर लंडन मध्ये आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती वर्ल्ड रेकॉर्ड बुकचे भारतातील प्रमुख ऍड. संतोष शुक्ला यांनी दिली. 

   लॉकडाऊन च्या काळात उत्कृष्ट समाजसेवा केल्याबबद्दल भारतात राजकीय नेते लोकप्रतिनिधी म्हणून  केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांची वर्ल्ड रेकॉर्ड बुक तर्फे  स्टार 2020 या बहुमानासाठी सर्वप्रथम निवड झाली आहे.  याबाबत चे ऑनलाइन प्रमाणपत्र वर्ल्ड रेकॉर्ड बुक तर्फे पाठविण्यात आले आहे.

 केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी सर्वप्रथम गो कोरोना चा नारा दिला तो नारा जगभर गाजला. संपूर्ण विश्वात लोकांनी स्वीकारला. तसेच लॉक डाऊन च्या काळात त्यांनी आपल्या निवासस्थानी सतत गरिबांना भोजनदान देणे सुरू ठेवले असून दिल्ली पुणे  आसाम मणिपूर आदी अनेक ठिकाणी ना रामदास आठवले यांच्या आदेशाने रिपब्लिकन पक्षातर्फे गरिबांना मोठ्या प्रमाणात भोजनदान आणि  अन्नधान्याची मदत केली जात आहे. लॉकडाऊन च्या काळात गरिबांचे मदतगार म्हणून ना रामदास आठवले आणि रिपब्लिकन पक्षाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड ने  घेतली आहे. याबाबत चा अहवाल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लवकरच सादर करण्यात येणार आहे असे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे कळविण्यात आले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार