सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अभिनेत्री तापसी पन्नूला तब्बल ३६ हजारांचं वीजबील

अभिनेत्री तापसी पन्नूलाही वाढीव वीजबिलाची झळ

Aishwarya Dubey ,twitter :@aishwar76156545
  • Jun 29 2020 9:06AM

एकीकडे लॉकडाउनमुळे सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडले असताना अवाच्या सवा दराने वीजबिल येत असल्याने महावितरणविरोधात राज्यभरात संताप आहे. वाढीव वीजबिलाचा फटका फक्त सर्वसामान्यच नाही तर सेलिब्रेटींनाही बसत असल्याचं समोर आलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री तापसू पन्नूला तब्बल ३६ हजारांची वीजबिल आलं आहे. तापसीने ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली असून संताप व्यक्त केला आहे.

तापसी पन्नूने ट्विट करत म्हटलं आहे की, “लॉकडाउनचे तीन महिने आणि कोणती नवी उपकरणं मी वापरली आहेत किंवा नव्याने विकत आणली आहेत ज्यामुळे मला इतकं वीजबिल आलं आहे. नेमकं कोणत्या वीजेचं शुल्क आकारत आहात?,” अशी संतप्त विचारणा तापसीने ट्विटच्या माध्यमातून केली आहे. यावेळी तापसीने अदानी वीज कंपनीला टॅगही केलं आहे.

 

तापसीने आपल्या ट्विटमध्ये आधीच्या महिन्यांच्या वीजबिलाचे फोटोही जोडले आहेत. एप्रिल महिन्यात तापसीला ४३९० तर मे महिन्यात ३८५० रुपये बिल आलं होतं. इतकंच नाही तर तापसीने आपण राहत नसलेल्या घरासाठीही भरमसाट वीजबिल आलं असल्याचं सांगितलं आहे.

 

आपण फक्त स्वच्छतेसाठी आठवड्यातून एकदा तिथे जात असल्याचं तापसीने म्हटलं आहे. तापसीने यावेळी वीजबिलावर प्रश्चचिन्ह उपस्थित करताना कोणी माझ्या नकळत घराचा वापर करतंय का याची चिंता असल्याचं म्हटलं आहे. अदानी कंपनीच्या प्रवक्त्याने मात्र, तापसीला पाठवलेले वीजदेयक वापरानुसार योग्यच आहे, असे स्पष्ट केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार