सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लाखो कारसेवकांच्या त्याग व बलिदानाने उजाडला आजचा सोन्याचा दिवस – आमदार मंगेश चव्हाण

लाखो कारसेवकांच्या त्याग व बलिदानाने उजाडला आजचा सोन्याचा दिवस – आमदार मंगेश चव्हाण भाजपातर्फे चाळीसगाव तालुक्यातील रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी कारसेवकांचा सत्कार

Deepak Chauhan
  • Aug 7 2020 3:41PM
भगवान प्रभु श्री राम मंदीर भूमिपूजनाच्या पावन पर्वावर व एतिहासिक दिनी रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी झालेल्या चाळीसगाव तालुक्यातील कारसेवकांचा सन्मान करण्याचे भाग्य मला प्राप्त झाले हा मी प्रभू श्रीराम यांचा आशिर्वाद मानतो. आज ज्या संघटनेने या आंदोलनाचे वैचारिक महत्व भारताच्या मनामनात तेवत ठेवले त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वोच्च पदाधिकारी सरसंघचालक आदरणीय मोहनजी भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत व ज्या पक्षाने या आंदोलनाला मूर्त स्वरूप देऊन आजचा सोन्याचा दिवस उगवला त्या भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान युगपुरुष नरेंद्रजी मोदी यांच्याहस्ते श्रीराम मंदिराचे भूमिपूजन आज संपन्न झाले. खर म्हणजे या विषयावर बोलण्याची माझी पात्रता नाही अस मी मानतो कारण हा दिवस उजाडण्यासाठी आजवर लाखो लोकांनी आपले आयुष्य, पद, प्रतिष्ठा पणाला लावली आहे. अनेकांनी जेल भोगली, लाठ्या काठ्या खाल्या, अनेक हुतात्मे झाले त्या सर्वांच्या प्रति कृतज्ञता म्हणून हा सोहळा आयोजित केले असल्याची प्रतिक्रिया चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केली. ते चाळीसगाव भारतीय जनता पक्षातर्फे रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी कारसेवकांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
 यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक डॉ.महेश पाटील, माजी आमदार साहेबराव घोडे, माजी आमदार ईश्वर जाधव, विश्वू हिंदू परिषदचे संदीप महाजन, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष के.बी.साळुंखे, बाळासाहेब नागरे आदी उपस्थित होते.

 प्रभूश्रीराम यांचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. अयोध्या येथे राममंदिर बनविण्यासाठी सन १९९० ते १९९२ दरम्यान करण्यात आलेल्या करसेवेत चाळीसगाव तालुक्यातील ६०० हून अधिक कारसेवकांनी सहभाग घेतला होता. कोविड ९० च्या पार्श्वभूमीवर त्यातील प्रातिनिधिक स्वरुपात २५ कारसेवकांचा सन्मान शाल – श्रीफळ – स्मृतीचिन्ह देऊन यावेळी करण्यात आला.

आमदार चव्हाण पुढे म्हणाले की, हा सत्कार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रातिनिधिक स्वरुपात आयोजित केला असून आगामी काळात कारसेवेत सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या घरी जावून सन्मान करणार आहोत. लोक आधी चिडवायचे की, RSS आणि भाजपा लोकांना फक्त मंदिर – मस्जिद वादात गुंतवून भावनिक राजकारण करत आहे, टीका करायचे  की मंदिर वही बनायेंगे पर तारीख नही बतायेंगे पण आता तारीख पण सांगितली आणि आता मंदिर सुद्धा आम्ही तेव्हडच भव्य बनवणार आहोत. ‘रघुकुल रीत सदा चल आई, प्राण जाई पर वचन न जाई ’ अश्या विचारधारेला मानणारे आम्ही आहोत. वचन देतो आणि पूर्ण करतो अश्या विचारधारेचा मी लोकप्रतिनिधी आहे याचा मला अभिमान आहे जे बोलायचे ते करायचे, एकवचनी आणि एकनिष्ठ राहायचे ही श्रीरामांची शिकवणुक आपण घेतली पाहिजे. सर्व जग राम मंदिर भूमिपूजनाचा उत्सव साजरा करत असताना या तिघाडी सरकारने मात्र आरती व जल्लोषावर बंदी घातल्याचा निषेध देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी केला.

संस्कार भारतीचे प्रकाश पोतदार सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर विश्वू हिंदू परिषदेचे संदीप महाजन यांनी रामजन्मभूमी आंदोलनाच्या वेळेचे अनुभव कथन करून त्यावेळेचा इतिहास उभा केला. सियावर राम चंद्र की जय...  जय श्रीराम... घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा शहर सरचिटणीस अमोल  नानकर यांनी केले.

विश्व हिंदु परिषदेचे बाळासाहेब नागरे, बजरंग दलाचे सीताराम वानखेडे, माजी सभापती रविंद्र चुडामण पाटील, माजी नगरसेवक तुकाराम आण्णा गवळी, शाम परदेशी, लक्ष्मण पवार, सुनील येवले, राजेंद्र कोतकर, जयवंत कोतकर, जिभाऊ पाटील, कोठावदे काका, सुनील नेरकर, बजरंग दादा, अलवाडी येथील कल्याणराव शिंदे, पिलखोड येथील ज्ञानेश्वर पाटील, दिपक महाले, गोविंद शुक्ल, कवीश शुक्ल, आदिश गुप्ता, अॅड प्रशांत पालवे, मंगलसिंग राजपूत, संजय नवल राजपूत, दिलीप बागुल, रामभाऊ पाटील, सुरेश तात्या सोनवणे, धोंडू निंबा निकम, नितीन अमृतकर, बापू शिरूरकर यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार