सुदर्शन न्युज परिणाम(इफेक्ट)
नंदुरबार येथील मेजवानी प्रकरणी चौकशी समिती गठीत शेवटी सुदर्शन न्युज ने दिलेल्या बातमीची जिल्हाधिकारी कार्यलयाने घेतली दखल
नंदुरबार दि. 10 : नंदुरबार येथे विवाहाप्रित्यर्थ आयोजित मेजवानीच्या वेळी 50 व्यक्तिंच्या मर्यादेचा भंग झाल्याचे वृत्त सर्वप्रथम सुदर्शन न्युज ने प्रकाशित केले असल्याने प्रस्तुत प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. त्यानुसार उपविभागीय अधिकारी वसुमना पंत यांनी नंदुरबार तहसीलदार भाऊसाहेब थोरात व नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांची संयुक्त चौकशी समिती नेमली आहे.
मेजवानीत स्वयंपाक करणारा खानसामा पॉझिटीव्ह आढळून आला आहे आणि अनेक नागरिक सहभागी झाल्याच्या वृत्ताने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. खानसामाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंना करोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे मेजवानीत सहभागी झालेल्या व त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंनी स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षेसाठी आरोग्य विभागामार्फत तात्काळ तपासणी करून घ्यावी,असे आदेश जिल्हाधिकारी यांच्या मार्फत समितीला देण्यात आले आहे.
नागरीकांना अशा व्यक्तींची माहिती असल्यास किंवा मेजवानीचे कुठल्याही प्रकारचे छायाचित्रण अथवा व्हिडीओ उपलब्ध असल्यास तहसील कार्यालय नंदुरबार किंवा उपविभागीय कार्यालय नंदुरबार येथे सादर करावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहनही श्रीमती वसुमना पंत यांनी केले आहे,परंतु निःपक्षपाती चौकशी केल्यास संबंधित नगरसेवकाच्या कार्यक्रमाची व्हिडीओ फीत ही संबंधित नगरसेवक जवळ असल्याची चर्चा गावात जोर धरत आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प