सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

हिंदुस्थानाच्या निर्मितीनंतर हिंदुत्व टिकावं हाच ध्यास... नथुराम गोडसे

' हिंदू राष्ट्रीय दल ' चे प्रणेता नथुराम गोडसे यांची जयंती आज 19 मे रोजी असल्याने हिंदू राष्ट्र या वर्तमान पत्राची दखल घ्यावी अशी इच्छा झाली, त्यांचे लेखन कार्य याच वर्तमानपत्राच्या मार्फत असायचे

Snehal Joshi
  • May 19 2020 11:08AM

' हिंदू राष्ट्रीय दल ' चे प्रणेता नथुराम गोडसे यांची जयंती आज 19 मे रोजी असल्याने  हिंदू राष्ट्र या वर्तमान पत्राची दखल घ्यावी  अशी इच्छा झाली, त्यांचे लेखन कार्य याच वर्तमानपत्राच्या मार्फत असायचे. त्यांचे आर्टिकल  इतके स्पष्ट असायचे की त्यांच्या सम आणि विषम विचारांचे दैनिकही त्यांचे हे आर्टिकल छापून आणायचे.

 सुरुवातीला ते  गांधीजींचे पक्के अनुयायी होते. गांधीजींच्या नागरिक अवज्ञा आंदोलना त त्यांनी नुसतेच समर्थन दिले किंवा लिहिले नव्हते तर त्यांनी त्यात  सक्रिय सहभाग पण घेतला होता.
 मात्र स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ते गांधीजींच्या विरोधात गेले. त्यांच्या मते गांधीजी आपले 'आमरण उपोषण' या  नीतीचा फायदा घेऊन  हिंदू हिताची हत्याच करीत आहे..

 नथुराम गोडसे यांचे नाव घेतल्यानंतर गांधींची हत्या डोळ्यासमोर येते. गांधीजींच्या   हत्येवर अनेक कहाण्या सांगितल्या जातात. या विषयावर अनेक आर्टिकल लिहिले गेले तर कितीतरी शाही या  कामात लागली. गांधीजींच्या हत्येत सतत त्यांचा उल्लेख  केला जातो. मात्र नेमके  कारण काय होत ...
 त्यावेळी असे म्हटले जायचे की कुठल्या तरी राजकीय पार्टीचा इशाऱ्यावरून हे झाला असावे ..
 मात्र त्यांच्या लिखाणात   पाकिस्तानाला दिलेली शिथिलता,  दिलेल्या पैशाची धग स्पष्ट जाणवत होती.
 गांधीजींवर याआधी तीन वेळा हत्ये चा प्रयत्न केला गेला होता. मात्र 30  जानेवारीचा  सुर्य उगवल्यानंतर हा प्रयत्न सफल झाला.
 खटल्यादरम्यान आणि त्यांचे वृत्तपत्र हिंदु राष्ट्र यात त्यांच्या हातन घडलेल्या गांधीजींच्या हत्ये  विषयी कारण दिली गेली.
भारत पाकिस्तान फाळणीसाठी गांधीच  जबाबदार आहेत.
 तसेच गांधीजीनी  दोन्ही बाजूला आपली छबी टिकवून ठेवण्यासाठी  ही  फाळणी  केली. 
गोडसे चे  असेलही  मत होतं की तेव्हाचे जे सरकार होते. ते मुसलमानांसाठी अनुचित रुपाने त्यांची  तृषाशांती करत आहे आणि हे सगळं गांधीजींच्या नीती प्रमाणे होत आहे. गोडसे त्यावेळी खूप जास्त टेन्शनमध्ये होते जेव्हा त्यांना कळलं की कश्मीर समस्या नंतरही  जिन्नानी  गांधीजींना पाकिस्तान दौऱ्याची सहमती दिली. त्यांना असं वाटायचं की हे म्हणूनच  होत आहे. कारण गांधीजींना  मुसलमानां प्रति जास्त दयाभाव आहे.  आणि हिंदूंच्या भावनांशी त्यांचे काहीही देणंघेणं नाही.

 भारत-पाकिस्तानच्या विचित्र फाळणीनंतर गोडसे गांधीजीं बद्दल बोलले होते की ते एक साधू असू शकतात पण एक  राज्यतज्ञ नाही

 एक  तर्क असाही दिला जात होता की पाकिस्तानला  
दिलेल्या शब्दानुसार 55 करोड रुपये देण्याची मानसिकता काँग्रेसच्या काही नेत्यांची नव्हती. मात्र गांधीजींना वाटत होते की काँग्रेस  नेत्यांनी  हा निर्णय  बदलावा. त्याकरता गांधीजींनी आमरण उपोषणाची धमकी दिली होती. गोडसेना असं वाटत होतं की गांधीजी मुसलमानांसाठी  हे करीत आहेत.
 सतत येणाऱ्या या बातम्या आणि सतत पाकिस्तान आणि मुसलमानांचा कळवळा यातून महात्मा गांधीची हत्या झाल्याचे पुढे आले. आणि गोडसेंना अटक झाली त्यांच्यावर  खटला चालविण्यात आला. पंजाब हायकोर्टाने 8 नोव्हेंबर1949 त्यांचं ट्रायल घेतलं आणि 15 नोव्हेंबर1949ला  अंबाला जेल येथे त्यांना फाशी देण्यात आली..

 भारतात CAAच्या दरम्यान हिंदू आणि मुसलमान लोकांच्या संख्याची  टक्केवारी पुढे आली आहे. भारतात  पाकिस्तान कडून  होणारे आतंकवादी हमले. भारतात राहून  पाकिस्तानच्या समर्थनाचे नारे. आणि जिहाद  प्रकरण.. आता जमातींचे कोरोनात देश भर मानवी बॉम्ब होऊन फिरणे.. या सगळ्याची चाहूल गोडसेंना किती वर्ष आधीच लागली होती. हिंदुत्व टिकवून ठेवणे ही मानसिकता देश प्रेम नाही का?

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार