सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पोलीस, महसूल प्रशासन व पत्रकारांच्या सहकार्याने बोईसरमधील 47 बांधकाम मजूर मध्यप्रदेशकडे रवाना

मूळचे मध्यप्रदेश मधील छतरपूर येथील रहिवासी असलेले 47 मजूर आपल्या बालकांसह पायी आपल्या मूळ गावी निघाल्याचे निदर्शनास येताच बोईसर पोलीस, महसूल प्रशासन व पत्रकारांनी काही तासातच आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून सदर मजुरांसाठी एसटी महामंडळ बसची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर काल, शुक्रवारी रात्री हे मजूर आपल्या मूळगावी रवाना झाले

Aishwarya Dubey
  • May 18 2020 1:05PM

बोईसर :-  मूळचे मध्यप्रदेश मधील छतरपूर येथील रहिवासी असलेले 47 मजूर आपल्या बालकांसह पायी आपल्या मूळ गावी निघाल्याचे निदर्शनास येताच बोईसर पोलीस, महसूल प्रशासन व पत्रकारांनी काही तासातच आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून सदर मजुरांसाठी एसटी महामंडळ बसची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर काल, शुक्रवारी रात्री हे मजूर आपल्या मूळगावी रवाना झाले. पायी गाव गाठण्याची तयारी करून निघालेल्या या मजुरांना अचानक एसटीची सुविधा उपलब्ध झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर मोठे समाधान व आनंद दिसून आला.

बोईसरमधील BARC वसाहतीत बांधकाम मजूर म्हणून हे सर्वजण काम करत होते. कोरोनामुळे लॉक डाउन जाहीर झाल्यानंतर हाताला काम नसल्याने हे मजूर काल शुक्रवारी सकाळी मध्यप्रदेशातील छतरपूर या आपल्या मूळ गावी पायी निघाले होते. दरम्यान BARC पासून काही अंतरावरच असलेल्या भीमनगर येथे हे मजूर पोहोचल्यानंतर नवाहाल साप्ताहिकाचे संपादक जगदीश करोतिया व पत्रकार विठोबा मराठे यांच्या निदर्शनास हे मजूर आले. त्यांनी या मजुरांकडे विचारपूस केली असता सुमारे 47 मजूर (17 महिला, 30 पुरुष) व त्यांची 10 बालके असे सुमारे 57 जण पायी मूळगावी निघाल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर सदर मजुरांसाठी वाहनाची सुविधा करण्याच्या उद्देशाने या पत्रकारांनी बोईसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्याशी संपर्क साधला असता कसबे यांनी लागलीच तहसीलदार सुनिल शिंदे यांना याबाबत कल्पना दिली. पुढे शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार पत्रकार जगदीश करोतीया, पालघर दर्पण वृत्तपत्राचे संपादक हेमेंद्र पाटील व पत्रकार प्रमोद तिवारी यांनी सर्व कामगारांची माहिती आधार कार्ड नंबरसह त्यांना दिल्यानंतर शिंदे यांनी बोईसर एसटी आगाराशी संपर्क साधून या मजुरांसाठी बसची व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या. दुसरीकडे या मजुरांची वैद्यकीय चाचणी तसेच इतर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. अखेर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री 9.50 वाजेच्या सुमारास 2 बसेसमधून हे मजूर महाराष्ट्राच्या शिरपुर सिमेपर्यंत जाण्यासाठी रवाना झाले. 

याकामी पालघर एसटी आगाराचे व्यवस्थापक संदीप शिंदे, बोईसर एसटी आगाराचे वरिष्ठ लिपिक दिनकर राठोड व बोईसर एसटी स्टँड इंचार्ज दीपक पाटील यांनी मोठे सहकार्य केले. तर सामाजिक कार्यकर्ते बाबू शेट्टी, कल्पेश मोरे व जाणता राजा हॉटेलचे मालक यांनी या मजुरांना प्रवासादरम्यान खाण्यापिण्याची सोय म्हणून विविध खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले. 

दरम्यान, बोईसर एसटी आजारातून या बसेस रवाना होताना पोलीस निरीक्षक कसबे,  
पालघर एसटी आगाराचे व्यवस्थापक शिंदे, पत्रकार हेमेंद्र पाटील, रामप्रकाश निराला, उमाकांत भारती आदी उपस्थित होते.

मजूर सुखरूप पोहोचले
दरम्यान, या मजुरांनी आज शनिवारी सकाळी पत्रकार करोतिया यांच्याशी संपर्क साधून आपण सुखरूपपणे मध्यप्रदेश सीमेपर्यंत पोहोचल्याचे तसेच पुढे आपल्या गावी जाण्यासाठी देखील बस उपलब्ध झाल्याची महितो देऊन त्यांच्यासह सर्वांचे आभार व्यक्त केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार