सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण

धनंजय मुंडे बुधवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झाले होते

Aishwarya Dubey
  • Jun 12 2020 12:01PM

राज्यात कोरोनानं थैमानं घातलं आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्यानंतर ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्याआधी धनंजय मुंडे यांनी सोमवारी अंबाजोगाई इथे विषाणू निदान प्रयोग शाळेचे उदघाटन देखील केले होते. आता मुंडे यांना कोरोनाची लागण नेमकी कुठे झाली हे अद्याप स्पष्ट नाही. मुंडे यांच्यासह दोन स्वीय सहाय्यक, कार चालकाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे.

धनंजय मुंडे बुधवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झाले होते. त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं संपर्कात आलेल्या मंत्र्यांसह अन्य लोकांनाही 28 दिवस होम क्वारंटाइन राहण्याचं आवाहन जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिलं आहे. ठाकरे सरकारमध्ये आतापर्यंत तिसऱ्या मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

 

ज्यात लॉकडाऊन नंतर रुग्णांच्या संख्येत धक्कादायक वाढ होत आहे. गुरुवारी राज्यात 3607 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 97 हजार 648 म्हणजेच लाखाच्या जवळ गेली आहे. तर गुरुवारी 152 नव्या मृत्युची नोंद करण्यात आली. त्यामुळे मृत्यूचा आकडा 3590वर गेला आहे. आज 1561 रुग्णांना सुट्टी देण्यात आली. आत्तापर्यंत राज्यात 46078 जण कोरोनामुक्त झाले आहेत

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार