सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्यात भयंकर स्थिती ; खुर्चीवर दिला जातोय oxygen

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. यात महाराष्ट्राचा क्रमांक पहिला आहे

Sudarshan MH
  • Apr 12 2021 1:03PM

 देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. यात महाराष्ट्राचा क्रमांक पहिला आहे. केवळ कोरोना रुग्णांची संख्याच नाही तर राज्यातील रुग्णालयांची स्थितीदेखील भयंकर आहे. रुग्णांच्या संख्येत सलग वाढ होत असतानाच रुग्णालयांमध्ये बेडची मोठी कमतरता जाणवू लागली आहे. अशा परिस्थितीत अनेक रुग्णांना खुर्चीवरच ऑक्सिजन पुरवला जात असल्याचं भयंकर चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात रविवारी कोरोनाचे आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण समोर आले आहेत. रविवारी 63,294 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यानंतर आता एकूण बाधितांची संख्या वाढून 34,07,245 झाली आहे.

उस्मानाबादमध्ये भयंकर चित्र सध्या पाहायला मिळत आहे. उस्मानाबाद सरकारी रुग्णालयाचा हलगर्जीपणा उघड झाला आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना बेड शिल्लक असतानादेखील खुर्चीवर बसवून ऑक्सिजन दिला जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. या प्रकारामुळे वृद्ध रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप होत आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी 681 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सध्या चार हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. केंद्राकडून पाठवण्यात आलेल्या विशेषतज्ञांच्या पथकानंही येथील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्राशिवाय छत्तीसगड, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांतूनही कोरोनाची 80.92 टक्के प्रकरणं समोर येत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार