सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कर्मचार्‍यांची मागणी, चहाटपर्‍या सुरू करा

आता लॉक डाऊन च्या पाचव्या टप्प्यात बरीच शिथिलता मिळाल्यानंतर शहरातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. वाहतूकही सुरळीत झाली आहे काही दिवसांपासून बेकरी व मोठ्या हॉटेल्सचे पार्सल सेवा देखील सुरू झाली आहे.

Snehal Joshi
  • Jun 8 2020 12:56PM
नागपूर --- आता लॉक डाऊन  च्या पाचव्या टप्प्यात बरीच  शिथिलता मिळाल्यानंतर शहरातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. वाहतूकही सुरळीत झाली आहे काही दिवसांपासून बेकरी व मोठ्या हॉटेल्सचे पार्सल सेवा देखील सुरू झाली आहे. असे असताना चहाची  दुकाने टपरी यांना मात्र अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे शासकीय निमशासकीय कर्मचार्‍यांना चहाची सवय आड येते आहे. आणि ही चहाची तलफ  भागवावी कशी हा प्रश्न पडला आहे

 लॉक डाऊन चे  5 वेगवेगळे टप्पे आपण पाहिले आहे. पहिल्या  व दुसऱ्या टप्प्यात शासनाने किराणामालाची दुकाने, औषधाचे दुकाने असे अत्यावश्यक दुकाने वगळता इतर कोणतेही दुकानांना परवानगी दिली नव्हती. तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात बऱ्यापैकी निर्बंध कमी केले. आता पाचव्या टप्प्यात बरीच  शिथिलता मिळाली आहे. सम विषम तारखेप्रमाणे बाजारपेठा सजल्या आहेत. बाजारातले सर्व दुकाने सुरू झाले असले तरी लहान हॉटेल व चहा टपरी यांना अजूनही परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे हे व्यवसायिक अडचणीत आले आहे. या छोट्या व्यवसायिकांनी बँक, पतसंस्था यांच्यामार्फत कर्ज उभारून हॉटेल, चहा, नाश्ता केंद्र सुरू केले आहेत यातील चहा, भाजी विक्रेत्याना दिवसभर मिळालेल्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो. लॉक  डाऊन मुळे व्यवसाय ठप्प झाल्याने  मोठ्या आर्थिक संकटात दिवस काढावे लागत आहेत. सध्या उत्पन्न काहीच नाही. मात्र दुकान भाडे मीटर सुरू आहे. शिवाय बँक, खाजगी वित्तसंस्था यांची देणी काही चुकलेली नाही. त्यामुळे या व्यावसायिकांना मोठा आर्थिक व मानसिक त्रासाला समोर जावे लागत आहे. चहा घेणे हे आता सवयीचा भाग झाला आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या माध्यमातून कर्मचारी अधिकारी चहा घेत असतात. परंतु चहाची दुकाने बंद असल्याने या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना चहाची तलफ  भागत नसल्याने जीव कासावीस होऊ लागला आहे.

 शासनाच्या नियमांचे पालन करून आम्ही व्यवसाय करू. लवकरात लवकर आमचे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी. अशी मागणी आता जोर धरते आहे. तर चहा पिण्याची इच्छा झाली, तर ती तलफ  भागवायची कशी....  हा प्रश्न पडल्याने शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी देखील चहा टपरी सुरू करण्याची मागणी केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार